---Advertisement---

वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची 3 मोठी कारणे

On: सोमवार, जून 24, 2024 5:45 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या गट-2 मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिका संघाने  टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 135 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आला असताना पावसामुळे सामना विस्कळीत झाला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेसमोर 17 षटकांत 123 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, जे त्यांनी 3 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले. तर यजमान वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर या महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही, अशी कोणती कारणे असू शकतात?

1. वेस्ट इंडिजला पावसाचा फायदा घेता आला नाही
दक्षिण आफ्रिकेने 2 षटकात 15 धावा केल्या, पण 2 विकेटही गमावल्या, पण नंतर पाऊस आला. पाऊस बराच वेळ सुरूच होता, त्यामुळे सामना पुन्हा सुरू होण्यास सुमारे एक तास लागला. पावसामुळे मैदानाची आऊटफील्ड संथ झाली होती, ज्याचा गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घ्यायला हवा होता. यजमान संघाने पावसापूर्वी 2 झटपट विकेट घेतल्या होत्या, मात्र पावसानंतर संघाला ती गती राखता आली नाही. सामना पुन्हा सुरू झाल्याच्या एक-दोन षटकांत एक विकेट पडताच आफ्रिका बॅकफूटवर गेली असती, पण सहाव्या षटकापर्यंत संघाने तिसरी विकेट वाचवली आणि तोपर्यंत संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे गेली होती.

2. चुकीच्या वेळी गुडाकेश मोतीला ओव्हर दिला
पावसापूर्वी वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचे 2 बळी घेतले होते. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात अल्झारी जोसेफने एडन मार्करामची विकेट घेतली. दरम्यान, सातव्या षटकात गुडाकेश मोतीला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले. मोतीने आपल्या एकाच षटकात 20 धावा दिल्या, त्यामुळे सामन्याला दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने कलाटणी मिळाली.

3. सर्व प्रसिद्ध खेळाडू मोठ्या सामन्यात अपयशी ठरले
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास उपांत्य फेरीत प्रवेश केला असता, अशी परिस्थिती स्पष्ट झाली होती. या करा किंवा मराच्या सामन्यात वेस्ट इंडिजचे जवळपास सर्वच प्रसिद्ध खेळाडू अपयशी ठरले. निकोलस पूरनने केवळ 1 धाव, शे होप शून्य, आंद्रे रसेलला सुरुवात मिळाली पण 15 धावा करुन तो धावबाद झाला. मोठे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला कर्णधार रोव्हमन पॉवेलही केवळ 1 धाव करुन तंबूत परतला. यापैकी कोणत्याही एका खेळाडूने 30-40 धावांचे योगदान वेस्ट इंडिजला मजबूत स्थितीत नेले असते.

महत्तवाच्या बातम्या-

निर्णायक सामन्यात भारतीय संघास ‘या’ खेळाडूंपासून राहवं लागेल सावध, अन्यथा पुन्हा पदरी निराशाच!
स्मृती मंधाना सारखं कोणीच नाही! महिला क्रिकेटमध्ये रचला आणखी एक इतिहास
आंद्रे रसलची एक चूक अन् वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---