विराट कोहली टी20 विश्वचषकासाठी न्यूयाॅर्कला पोहचला आहे. विराट कोहली आणि भारतीय क्रिकेटपटूच्या चाहत्यांची संख्या पाहता यजमान अमेरिका सुरक्षेसाठी कोणतीही संधी घेऊ इच्छित नाही. दहशतवादी संघटनांकडून स्पर्धेच्या सुरक्षेला धोका असल्याच्या अनेक अहवालानंतर भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषत: विराट कोहलीची सुरक्षा अत्यंत कडक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कोहली अनेक स्तरांच्या सुरक्षेसह मैदानात जाताना दिसत आहे.
👑🏏📸#ViratKohli #T20WorldCup #T20WC24 pic.twitter.com/mByLeq0nps
— virat_kohli_18_club (@KohliSensation) June 1, 2024
घोड्यावर बसलेल्या पोलिसांच्या पाठोपाठ, माजी भारतीय कर्णधाराला सुरक्षा अधिकारी आणि सशस्त्र रक्षकांनी वेढलेले पाहू शकतो. व्हिडिओमध्ये कोहलीसोबत रिंकू सिंहही दिसत आहे. न्यूयॉर्क आणि आसपासच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी विशेष सुरक्षा वाढवली आहे कारण न्यूयॉर्कमध्ये 9 जून रोजी नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी त्यांच्या कार्यालयातून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मी न्यूयॉर्क राज्य पोलिसांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी वाढवणे, वाढीव पाळत ठेवणे आणि कसून तपासणी प्रक्रिया समाविष्ट आहे. सार्वजनिक सुरक्षा ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि क्रिकेट विश्वचषक हा सर्व चाहत्यांसाठी सुरक्षित अनुभव असेल याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. असे त्यांनी अधीच स्पष्ट केले आहे.
शनिवारी रात्री भारताने न्यूयॉर्कमध्ये बांग्लादेशविरुद्ध सराव सामना खेळला. बांग्लादेशच्या फलंदाजीदरम्यान एका चाहत्याने सुरक्षा प्रोटोकॉल तोडून भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या जवळ गेला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेचच त्याला पकडून बेड्या ठोकले.
महत्तवाच्या बातम्या-
कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यात चालायं तरी काय? सामन्यातील दोन निर्णयांमुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम!
रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल नाही तर ‘हे दोन’ खेळाडू करतील विश्वचषकात टीम इंडीयासाठी सलामी!
भारत-बांगलादेश सराव सामन्यादरम्यान संजय मांजरेकरांचा रवींद्र जडेजाला टोला!