हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वाखाली या संघात एकूण 7 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. उथप्पा व्यतिरिक्त भारताने मनोज तिवारी, शाबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी, केदार जाधव आणि भरत चिपली यांचा संघात समावेश केला आहे. ही स्पर्धा 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान हाँगकाँगमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळी या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह एकूण 12 संघ सहभागी होत आहेत.
भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, हाँगकाँग, नेपाळ, न्यूझीलंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ सहभागी होणार आहेत.
हाँगकाँग सिक्स 2024 ही स्पर्धेची 20 वी आवृत्ती असणार आहे. ही स्पर्धा सात वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा 1992 मध्ये खेळली गेली होती. तर शेवटची आवृत्ती 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिका चॅम्पियन बनला होता. हे सामने तीनही दिवशी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहेत. स्पर्धेची तिकिटे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
🚨 TEAM INDIA FOR HONG KONG SIXES TOURNAMENT. 🚨
Robin Uthappa (C), Jadhav, Manoj Tiwary, Nadeem, Goswami, Stuart Binny and Bharat Chipli. pic.twitter.com/xGp0dAHtIF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
हाँगकाँग सिक्स ही आयसीसी द्वारे मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत 8 ते 12 संघ सहभागी होतात. यष्टिरक्षक वगळता प्रत्येक गोलंदाजाला एक षटक टाकावे लागते. त्यामुळे ही स्पर्धा अष्टपैलू खेळाडूंसाठी अधिक योग्य मानली जाते. इंग्लंडने ही स्पर्धा सर्वाधिक 5 वेळा जिंकली आहे. भारत 2005 मध्ये फक्त एकदाच चॅम्पियन बनला होता.
प्रत्येकी सहा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये सामने खेळले जातात. ज्यामध्ये 5 षटके असतात. मात्र, अंतिम सामन्यात एक ओव्हर 8 चेंडूंची असते. 5 षटक संपण्यापूर्वी 5 विकेट पडल्यास, शेवटचा फलंदाज फलंदाजी करेल आणि पाचवा फलंदाज धावपटूची भूमिका बजावेल. नाबाद असलेल्या फलंदाजाला नेहमी स्ट्राइकवर राहावे लागेल आणि तो बाद होताच डाव संपेल. याप्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाते.
हेही वाचा-
women’s t20 world cup; ऑस्ट्रेलियाचा दणका, पाकिस्तान बाहेर..?, भारताचा मार्ग सुककर!
IND vs BAN: हर्षित राणाचे पदार्पण? सॅमसन-हार्दिक आणि मयंक यादव बाहेर? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
बीसीसीआयमुळे आरसीबीला करोडोंचा फायदा! मेगा लिलावापूर्वी बंगळुरुसाठी आनंदाची बातमी