आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. फायनलमध्ये इंग्लंडला 100 धावांनी पराभूत करत टीम इंडियाने विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला.
वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 175 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने हरारे स्पोर्ट्स कल्बमधील स्टेडियममध्ये इंग्लंडसमोर 412 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. मात्र धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजासमोर पूर्ण 50 षटकेही खेळता आलं नाही. भारतानं इंग्लंडला 40.2 षटकात 311 घगुंडाळलं. ज्यामुळे संघाने अंतिम सामन्यात 100 धावांनी विजय मिळवला. भारताची अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही सहावी वेळ ठरली.
बातमी अपडेट होत आहे..






