वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग WMPL 2025 स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्सने रायगड राॅयल्सवर 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. रायगडने दिलेलं 130 धावांचं लक्ष्य सोलापूरने 17.2 व्या षटकातच गाठलं. कर्णधार तेजल हसनबीसच्या दमदार अर्धशतकासाठी तिला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आलं.
रायगड राॅयल्सने प्रथम फलंदाजी करताना 130/6 अशी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये श्रावणी देसाईने सर्वाधिक 43(45) धावा केल्या, तर किरण नवगिरेने 18(11) धावांची जलद खेळी केली. सोलापूरकडून लक्ष्मीदेवी यादवने 2 षटकांत 13 धावा देत 2 विकेट घेतल्या, तर शरयू कुलकर्णीने 4 षटकांत केवळ 17 धावा देत 1 बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सोलापूरने पहिल्या षटकात ईश्वरी असावरीची विकेट गमावली. मात्र यानंतर संघाने भक्कम सुरुवात केली. कर्णधार तेजल हसनबीसने आक्रमक फलंदाजी करत 36 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या. तिच्या साथीला ईश्वरी सावकारने 38 चेंडूंमध्ये 33 धावा करत मोलाची साथ दिली. मात्र ती धावबाद झाली. अखेर मुक्ता मगरेने नाबाद 34 धावा करत संघाला विजयाच्या पलीकडे पोहोचवलं.
हा सोलापूरचा सलग दुसरा विजय ठरला असून त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे, रायगड राॅयल्सला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांच्यासमोर आता बाद फेरीसाठी आव्हान उभं राहिलं आहे. गुणतालिकेबद्दल बोलायचे झाले तर सोलापूर स्मॅशर्सने 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतले आहे. तर रायगड राॅयल्स संघ शून्य विजयासह तळाशी आहे.
सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रायगड राॅयल्स स्कोअरकार्ड
रायगड राॅयल्स 130/6 (20 षटके)
श्रावणी देसाई 43(45)
किरण नवगिरे 18 (11)
सोलापूर स्मॅशर्स
लक्ष्मीदेवी यादव 2/13 (2 षटके)
शरयू कुलकर्णी 1/17 (4 षटके)
सोलापूर स्मॅशर्स 130/3 (17.2 षटके)
तेजस हसनबीस 56(36)
मुक्ता मगरे 34 (27)*
रायगड राॅयल्स
प्रज्ञा वीरकर 1/27 (4 षटके)
ईशा पठारे 1/ 23 (3 षटके)
सोलापूर स्मॅशर्स 7 विकेट्सने विजयी






