भारतीय महिलांविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दारुण पराभव पत्करल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात सूड उगवत आहे. त्याचा परिणाम टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात दिसून आला. आफ्रिकेने पहिल्या टी20 सामन्यात भारतावर 12 धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. 3 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका आता 1-0 ने पुढे आहे. चेन्नईतील पराभवानंतर टीम इंडियासाठी पुढचा सामना करो या मरो सारखी होणार आहे.
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या. आफ्रिकेसाठी सलामीवीर ताजमिन ब्रिट्सने स्फोटक खेळी खेळली. तीने अवघ्या 56 चेंडूत 10 चौकार आणि 3 शानदार षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या. याशिवाय मरिजन कॅपनेही टीम इंडियाच्या गोलंदाजांचा बदला घेतला आणि 33 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली. लॉरा वॉलवॉर्टनेही 33 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या शेफाली वर्माला या सामन्यात केवळ 18 धावाच करता आल्या. मात्र, स्मृती मानधनाने एक टोक राखले, मात्र अर्धशतकाआधी अवघ्या 4 धावा कमी असताना मंधानाने तिची विकेट दिली. हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्यात अप्रतिम भागीदारी पाहायला मिळाली. टीम इंडियाने सामन्यावर ताबा मिळवला. मात्र 35 धावांवर हरमनप्रीत कौरने तिची विकेट गमावली. मात्र, जेमिमाने 30 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या मात्र तिला सामना जिंकवता आला नाही. टीम इंडिया 20 षटकात केवळ 177 धावा काढू शकली.
टीम इंडियाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. राधा यादव आणि पूजा वस्त्राकरने 2-2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर या संघाचे गोलंदाज सतत आपली पकड घट्ट करत होते. दक्षिण आफ्रिकेने 6 गोलंदाजांचा वापर केला ज्यापैकी 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
महत्तवाच्या बातम्या-
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा राज्य सरकारकडून विधानभवनात सत्कार
‘मी ही रडत होतो तो ही रडत होता’ वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात कोहलीनं केला मोठं खुलासा
रोहित-विराटच्या टी20 निवृत्ती बाबत सुरेश रैना खूपच भावूक, चक्क बीसीसीआयकडे केली विशेष मागणी