---Advertisement---

WPL स्पर्धेला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी कुठे पाहायचा सामना

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2025 8:00 AM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीग (WPL) चा तिसरा हंगामाला आज 14फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना बडोदा येथील कोटाम्बी स्टेडियमवर गुजरात जायंट्सशी होईल. या वर्षी ही स्पर्धा चार ठिकाणी होणार आहे. ज्याचा पहिला सामना बडोदा येथून सुरू होईल. त्यानंतर बंगळुरूमध्ये आणि त्यानंतर लखनऊ आणि मुंबईत सामने खेळवले जातील. लीग स्टेजचे सामने 11 मार्चपर्यंत सुरू राहतील. एलिमिनेटर 13 मार्च रोजी होईल. अंतिम सामना 15 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल.

दिल्ली कॅपिटल्स यावर्षी कोणतेही सामने आयोजित करणार नाही. गेल्या वर्षी त्यांनी बेंगळुरूच्या सहकार्याने सामने आयोजित केले होते. यावेळी कोणत्याही दिवशी दोन सामने होणार नाहीत. म्हणजेच डबलहेडर होणार नाही. 5 संघांच्या या स्पर्धेत, सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. या लीगमध्ये एकूण 22 सामने खेळवले जातील. गट फेरीत 23 फेब्रुवारी, 2 मार्च, 4 मार्च, 5 मार्च आणि 9 मार्च रोजी कोणतेही सामने होणार नाहीत.

महिला प्रीमियर लीग 2025 कधी सुरू होईल?
महिला प्रीमियर लीग 2025 ची सुरुवात आज शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी होईल.

महिला प्रीमियर लीगचे सामने कुठे होतील?
2025 हंगामातील WPL सामने वडोदरा, बेंगळुरू, लखनऊ आणि मुंबई येथे खेळवले जातील.

WPL 2025 चे सामने किती वाजता सुरू होतील?
सर्व WPL 2025 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

WPL 2025 चे थेट प्रक्षेपण आपण टीव्हीवर कुठे पाहू शकतो?
WPL 2025 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल.

WPL 2025 चे थेट स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहता येईल? WPL 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

हेही वाचा-

बीसीसीआयचे नवे नियमन, खेळाडूंच्या कुटुंबीयांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘नो एन्ट्री’!
आरसीबीचा कर्णधार झाल्यानंतर रजत पाटीदारची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांची मने जिंकली!
यशस्वी जयस्वालची चॅम्पियन्स ट्रॉफी संधी हुकली, आता या स्पर्धेत दिसणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---