---Advertisement---

विलियम्सनसह ‘या’ ४ सदस्यांना भारतात ठेऊन न्यूझीलंडचे अन्य खेळाडू मायदेशी रवाना

On: गुरूवार, मे 6, 2021 7:00 PM
kane-williamson
---Advertisement---

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच आता सर्व परदेशी खेळाडू देखील आपल्या घरी जाण्यच्या वाटेवर आहे. परंतु न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कर्णधार केन विलियम्सन आणि इतर ३ सदस्यांना भारतातच राहण्याचे आदेश दिले आहेत.

येत्या जून महिन्यात न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर १८ जून ते २२ जून दरम्यान त्यांना भारतीय संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड व्हाईट म्हणाले की, “आम्ही बीसीसीआय आणि आयपीएलच्या विविध फ्रँचायझी समवेत खेळाडूंच्या निघण्याच्या संदर्भात विविध रणनीतींवर काम केले आहे आणि या आव्हानात्मक काळात त्यांच्या पाठिंब्याचे आम्ही कौतुक करतो.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे देखील आभार मानतो की, ते भारतात असलेल्या कसोटी संघातील ४ सदस्यांना आपल्या इथे आश्रय देणार आहेत.”

या ४ सदस्यांमध्ये, कर्णधार केन विलियम्सन, काईल जेमिसन, फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आणि फिजीओ टॉमी सिमसेक यांचा समावेश असणार आहे.

तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले की, “न्यूझीलंडचे उर्वरित आयपीएल खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि समालोचक यांच्यासह बोल्ट शनिवारी ऑकलंड येथे दाखल होणाऱ्या दोन चार्टर्ड विमानांपैकी एका विमानाने नवी दिल्लीहून रवाना होईल. त्यानंतर तो विलग्नवासात असेल. तसेच त्याचा विलग्नवास २२ मे रोजी संपेल. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत एक आठवडा राहून जूनच्या सुरुवातीलाच ब्रिटनसाठी रवाना होईल.”

आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम, काइल मिल्स, शेन बॉन्ड, माईक ह्यूसन, टिम सिफर्ट, अ‍ॅडम मिलनी, स्कॉट कुग्लेजिन आणि जेम्स पेमेंट हे देखील न्यूझीलंडला परतणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

ओय होय! वाढदिवशी पती जसप्रीत बुमराहला किस करताना दिसली संजना; गोलंदाजाने भन्नाट कॅप्शन देत शेअर केला फोटो

दु:खद! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचे झाले कोरोनाने निधन; दोन आठवड्यांपूर्वीच गमावले होते आईला

“भारत हा एक विशेष देश आहे, जो यावेळी…”, जॉस बटलरचा आयपीएल सोडताना भावूक संदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---