आपले पहिले वहिले जेतेपद मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. रविवारी (१४ नोव्हेंबर) उभय संघांमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. अनेकांनी पाकिस्तान आणि भारत हे दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील अशी भविष्यवाणी केली होती. परंतु ही भविष्यावाणी खोटी ठरवत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना रोमांचक होणार यात काही शंका नाही.
परंतु टी२० विश्वचषकातील आतपर्यंतचा इतिहास पाहिला तर न्यूझीलंड संघ सामना हा सुरू होण्यापूर्वीच पराभूत झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आणि त्यांच्या परावभामागे भारतीय संघाचे कनेक्शन आहे. काय आहे यामागील प्रमुख कारण चला जाणून घेऊया.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाकडून पराभूत झाल्यानंतर, भारतीय संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग बंद झाला होता. पण एक प्रसिद्ध वाक्य आहे ना- ‘हम तो डुबेंगे सनम, तुम्हे भी ले डुबेंगे’ आणि तेच वाक्य आधी भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानला लागू झाले आणि आता हेच न्यूझीलंडलाही लागू होऊ शकते.
गेल्या १४ वर्षांचा इतिहास पाहिला तर, भारतीय संघाने ज्या संघासोबत टी२० विश्वचषकातील साखळी फेरीतील सामने खेळले आहेत, तो संघ कधीच जेतेपद मिळवू शकला नाहीये. याचा अर्थ असा की, भारतीय संघासोबत साखळी फेरीतील सामने खेळणाऱ्या संघाला नॉकआऊट सामन्यात विजय मिळवता आला नाहीये. याची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तान संघाला साखळी फेरीतील सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केले होते.
No team that India played before knockouts has won the ICC #T20WorldCup :
2007: Sco, Pak, NZ, Eng, SA (Champions: Ind)
2009: Ban, Ire, WI, Eng, SA (Pak)
2010: Afg, SA, Aus, WI, SL (Eng)
2012: Afg, Eng, Aus, Pak, SA (WI)
2014: Pak, WI, Ban, Aus (SL)
2016: NZ, Pak, Ban, Aus (WI)— Ajinkya Dhamdhere (@ajinkyasd) November 13, 2021
टी२० विश्वचषक २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४ आणि २०१६ पर्यंत भारतीय संघाने ज्या संघांचा सामना केला आहे. त्या संघाला जेतेपद मिळवता आले नाहीये.
यंदा भारतीय संघाने टी२० विश्वचषकात अफगानिस्तान, स्कॉटलॅंड, नामिबिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघासोबत सामना खेळला आहे. यातील अफगाणिस्तान, नामिबिया संघांचा प्रवास सुपर १२ फेरीतच संपला. पुढे पाकिस्तान संघही उपांत्य फेरीपर्यंत जाऊन स्पर्धेबाहेर झाले आहे. त्यानंतर आता न्यूझीलंड संघ इतिहास बदलतो की, न्यूझीलंड संघाचीही इतिहासात नोंद होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कॉनवेच्या जिद्दीला सलाम! दुखापतग्रस्त असूनही संघाला चॅम्पियन बनवण्यात करतोय खेळाडूंची मदत- Video
टी२० विश्वचषकात ‘असा’ राहिलाय ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास, एक वेळा तोंडून हिरावलाय जेतेपदाचा घास