---Advertisement---

“भारतीय संघासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ‘ही’ गोष्ट असेल कठीण”, न्यूझीलंडच्या अष्टपैलूचे विधान

On: गुरूवार, मे 6, 2021 10:31 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची चर्चा सुरू होती. त्यानंतर कडक बायो बबलचे पालन करून सुद्धा आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर वृद्धीमान सहा पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. या चर्चेचा प्रारंभ न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमने केला आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला, जुलै २०१९ मध्ये प्रारंभ झाला होता. तेव्हापासून ९ आंतरराष्ट्रीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी झुंज देताना दिसून आले होते. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड या संघांनी बाजी मारली होती. न्यूझीलंड संघ, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला होता. अशातच येत्या, १८ ते २२ जून दरम्यान साउथेम्प्टन मध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होते.त्यांनतर इंग्लंड संघाला मायदेशात पराभूत करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या दोन्ही मालिकेत,अनुभवी खेळाडूंसह, युवा खेळाडूंनीही कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी कोणाला संघात स्थान द्यावे हा प्रश्न विराट कोहलीला नक्कीच पडला असेल. अशातच आयसीसीने कॉलिन डी ग्रँडहोमचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात कॉलिन डी ग्रँडहोमच्या एका वक्तव्याचा समावेश आहे. ग्रँडहोमच्या मते, “भारताकडे जितके खेळाडू आहेत ते सर्व काही सांभाळून घेऊ शकतात. यावेळी त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत ,तसेच चांगले फिरकी गोलंदाज देखील आहेत. मात्र यामुळेच अंतिम संघ निवडणे त्यांच्यासाठी कठीण जाऊ शकते.”

न्यूझीलंड संघाला या मोठ्या सामन्यापूर्वी मोठा फायदा होऊ शकतो. कारण अंतिम सामना खेळण्यापूर्वी, न्यूझीलंड संघ,इंग्लंड संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाचा सराव देखील होऊन जाईल.तर दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील उंच आकाशात भरारी घेत असेल, भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच मायभूमी वर २-१ ने पराभूत केले होते. तर इंग्लंड संघाला ४-१ ने धूळ चारली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

पंतप्रधानांनी स्वतः यावे आणि भारतात रस्त्यावर पडलेले मृतदेह पहावे, मायकेल स्लेटर पुन्हा बरसला

दबाव झेलता न आल्याने आईसमोर बसून रडायचा पुजारा, मग अशी केली समस्येवर मात

या ३ प्रमुख कारणांमुळे आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये झाला कोरोना व्हायरसचा शिरकाव?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---