---Advertisement---

विश्वचषकात पराभूत झाल्यावर नेमार फुटबॉल सोडून खेळतोय हा खेळ

On: शुक्रवार, जुलै 27, 2018 7:05 PM
---Advertisement---

ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमारचे नशीब फिफा विश्वचषकात जरी चालले नाही तरी मात्र पोकर या गेममध्ये त्याचे नशीब चांगलेच उजळले आहे.

मैदानावर खेळण्यापेक्षा असभ्य वर्तनामुळे नेमार प्रसिद्ध आहे. आताच झालेल्या फिफा विश्वचषकात त्याने मैदानावर वेळ वाया घालवल्याने त्याला सोशल मिडियावर चाहत्यांनी ट्रोल केले.

ह्या सगळ्या गोष्टी विसरून त्याने ब्राझिलमधील एका पोकर स्पर्धेत आपले हात चालवले. या गेममध्ये तो पहिल्या सहामध्ये राहिला.

नेमारने लावलेल्या त्याच्या मूळ रकमेच्या तब्बल 11 पटी पेक्षा जास्त रक्कम जिंकली.

यावेळी त्याने 7000 ब्राझिलीयन चलनाने चालीला सुरूवात करून शेवटी त्याने 79,440 ब्राझिलीयन चलन एवढी रक्कम जिंकली.

“मी पहिल्यादांच पोकरच्या या स्पर्धेत खेळलो. अंतिम फेरीत पोहचल्याने मला खूप आंनद झाला. हा एक चांगला अनुभव होता”, असे नेमार म्हटले आहे.

पॅरीस सेंट जर्मनच्या या खेळाडूने ब्राझिलकडून विश्वचषकात खेळताना 5 सामन्यात 2 गोल केले.

तसेच क्रिस्तियानो रोनाल्डो हा ऑनलाईन पोकर खेळाडू असून तो एका ऑनलाईन पोकर कंपनीचा प्रवक्ताही आहे. पॅरीस सेंट जर्मनचा माझी फुटबॉलपटू नेने आणि मॅंचेस्टर सिटीचा गॅब्रिएल जेसस हे दोघेही या पोकरच्या स्पर्धेत खेळले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?

या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment