जागतिक फुटबॉल क्रिकेटमध्ये भारताच्या दोन फुटबॉल पटूंची नावं हमखास घेतली जातात. त्यात एक आहे बायचुंग भूतिया तर दुसरा सुनिल छेत्री. याच सुनिल छेत्रीच्या नावावर असा एक विक्रम आहे, जो ब्राझीलच्या नेमार ज्युनीयर, पोर्तुगालच्या क्रिस्तीयानो रोनाल्डो किंवा अगदी विश्वविजेत्या अर्जेंटीनाच्या लिओनल मेस्सीकडेही नाही.
Intercontinental cup 2023मध्ये 18 जून रोजी झालेल्या सामन्यात भारताने लेबननचा 2-0ने पराभव केला. Intercontinental cup स्पर्धेचा ही फायनल उडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे झाली. भारताकडून जे दोन गोल झाले त्यातील एक गोल कर्णधार सुनिल छेत्री (Sunil Chhetri) याने केला. याबरोबर त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला. त्याने भारताकडून 137व्या सामन्यात खेळताना 87वा गोल केला. याबरोबर प्रत्येक सामन्यामागे सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावाव झाला.
छेत्रीने प्रत्येक सामन्यामागे 0.64 गोल केले आहे. जो एक जागतिक विक्रम आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर ब्राझीलचा नेमार आहे. त्याने 124 सामन्यांत 77गोल केले आहे. त्याची प्रत्येक सामन्यामागे गोल करण्याची सरासरी 0.62 आहे. 199 सामन्यात पोर्तुलागलसाठी 122 गोल करणाऱ्या क्रिस्तियानो रोनाल्डोची हीच सरासरी 0.61 एवढी आहे तर अर्जेंटीनाचा विश्वविजेता कर्णधार लिओनल मेस्सीने 0.59 च्या सरासरीने देशासाठी गोल केले आहेत. 175 सामन्यात त्याने 103 गोल केले आहेत.
यामुळे सहाजीकच सुनिल छेत्रीच सगळीकडून कौतूक होत आहे. आंध्रप्रदेशातील सिकंदराबादमध्ये जन्मलेल्या छेत्रीने अनेक क्लबकडून फुटबॉल खेळले आहे. तो भारताच्या अंडर 20, आणि अंडर 23 संघाचा भाग राहिला आहे. 2005 सालापासून तो भारताकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत आहे. छेत्री लवकरच बाप होणार आहे. यासाठी त्याने मैदानावर काही दिवसांपुर्वीच एक शक्कल लढवून आपल्या बायकोला खास भेट दिली. ज्याचे खूप कौतूक झाले होते. (Neymar, Ronaldo and Messi! Even more than them, Sunil Chhetri has sacrificed his life for the country)
महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच Ashes सामन्यात नेथन लायनचा विश्वविक्रम, स्टुअर्ट ब्रॉडसह अश्विनलाही दिला धक्का
Ashes । पावसामुळे व्यर्थ जाणार जाणार ऑस्ट्रेलियाची मेहनत! विजयाच्या जवळ असताना थांबवला गेला सामना