पॅरीस-सेंट जर्मनचा(पीएसजी) स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डो जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये चांगले बदल घडवून आणेल.
रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच रियल माद्रिद बरोबरचा करार संपवून जुवेंटसशी जोडला गेला. गेली नऊ वर्षे माद्रिद कडून खेळताना त्याने 438 सामन्यात 451 गोल केले होते. तसेच संघाला चार युरोपियन चॅम्पियनशीप, दोन लालीगा आणि दोन कोपा डेल-रे असे चषक जिंकून दिले आहेत.
त्याच्या या संघ बदलण्याच्या निर्णयाविषयी बोलताना नेमार म्हणाला, “माझ्या मते रोनाल्डोचा निर्णय योग्य आहे. त्याच्या या संघसमावेशाने इटालियन फुटबॉलमध्ये अनेक बदल पाहण्यास मिळेल कारण मी लहान होतो तेव्हा मी या क्लबचे सामने बघितले आहे.”
“तो फुटबॉलमधील एक दिग्गज आहे. त्याला हा निर्णय घेताना खूप त्रास झाला असेल. त्याच्या पुढील कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा”,असे नेमार पुढे म्हणाला.
मी 100% पीएसजीकडूनच खेळणार आहे, असे म्हणत नेमारने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. नेमार पीएसजी सोडून रियलशी करार करणार आहे अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.
पायाच्या दुखापतीमुळे नेमार फेब्रुवारीपासून पीएसजीकडून एकही सामना खेळला नाही. त्याने रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात 2 गोल केले. त्याचा संघ ब्राझिल या स्पर्धेतील उपांत्यपुर्व फेरीत पोहचला होता. यामध्ये त्यांना बेल्जियमकडून 1-2 असे पराभूत व्हावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
–बार्सिलोनाची ट्रेनिंग जर्सी आणि तोटेनहॅमची मुख्य जर्सी सारखीच!
–रशिया फिफा विश्वचषक ठरली फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धा