दक्षिण आफ्रिका येथे पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक पार पडला. रविवारी (29 जानेवारी) पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केले. भारतीय महिला संघाने कोणत्याही स्तरावर जिंकलेला हा पहिला क्रिकेट विश्वचषक आहे. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय पुरुष संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. त्यांनी देखील या आनंदाच्या क्षणी भारतीय मुलींचे अभिनंदन केले.
पोचेस्ट्राम येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. टिटस साधू, पार्श्वी चोप्रा व अर्चना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत इंग्लंडला केवळ 68 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर शफाली वर्मा, सौम्या तिवारी व गोंगडी त्रिशा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. वरिष्ठ अथवा कनिष्ठ स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.
A special message from Lucknow for India's ICC Under-19 Women's T20 World Cup-winning team 🙌 🙌#TeamIndia | #U19T20WorldCup pic.twitter.com/g804UTh3WB
— BCCI (@BCCI) January 29, 2023
त्याचवेळी भारतीय पुरुष संघ लखनऊ येथे न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामना खेळत होता. या सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवला. त्यानंतर बीसीसीआयच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यामध्ये भारतीय खेळाडू विश्वविजेत्या संघाचे अभिनंदन करताना दिसले. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हे अभिनंदन करण्याचा मान युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दिला.
द्रविड म्हणाले,
“भारतीय महिला क्रिकेटमधील हा मैलाचा दगड ठरणारा क्षण आहे. या क्षणी मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अशाचप्रकारे अंडर 19 संघाचा विश्वविजेता कर्णधार राहिलेल्या पृथ्वी शॉ याला आमंत्रित करतो.” त्यानंतर पृथ्वी म्हणाला,
“संघाने उत्कृष्ट कामगिरी करत हे यश मिळवले. त्याप्रसंगी आम्ही सर्वजण तुमचे अभिनंदन करतो.”
पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात भारताने 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्या संघाचे प्रशिक्षकही द्रविड हेच होते.
Nice gesture from Dravid to ask Prithvi Shaw to give the congratulatory message to the Women’s U-19 team
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 100 धावांसाठी न्यूझीलंडने रडविले! 1 चेंडू राखून भारताचा विजय
“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास
BIG BREAKING! पोरींनी रचला इतिहास, U19 टी20 विश्वचषकावर भारताने कोरले नाव