वेस्ट इंडिजचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यंदाच्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याने स्पर्धेतील 9 सामन्यात 300 हून अधिक धावा केल्या आहेत. आता निकोलस पूरनने स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात शतक झळकावले आहे. या खेळीत निकोलस पूरनच्या फलंदाजीचा तोडगा कोणत्याही गोलंदाजकडे नव्हता. शेवटच्या साखळी सामन्यात त्याचा संघ त्रिनबागो नाईट रायडर्सने मोठा विजय मिळवला. संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला असून संघाला एलिमिनेटर सामन्यात खेळावे लागणार आहे.
निकोलस पूरनने गयाना ॲमेझॉन वॉरियर्सविरुद्ध 59 चेंडूंत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 171.19 होता. संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 211 धावा केल्या. जेसन रॉय 26 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. गयानाकडून शामर जोसेफने 3 बळी घेतले. मात्र, त्याने 50 धावाही खर्च केल्या. त्याचवेळी या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघ 18.5 षटकांत 137 धावांत सर्वबाद झाला आणि 74 धावांनी सामना गमावला.
💯 for Nicholas Pooran in the CPL!
🙇♂️ What a beast in T20s!
His remarkable consistency continues to amaze. pic.twitter.com/iakC7Eszsi
— Hemant Bhavsar (@hemantbhavsar86) September 30, 2024
गयानासाठी चार फलंदाजांनी 20 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. तर इतर फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. रहमानउल्ला गुरबाजने 22 चेंडूत 36 धावा, शाई होपने 19 चेंडूत 28 धावा, गुडाकेश मोतीने 26 धावा आणि कर्णधार इम्रान ताहिरने 20 धावा केल्या. त्रिनबागो संघाकडून नॅथन एडवर्ड्स, टेरेन्स हिंड्स आणि वकार सलामखिल यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. पराभवानंतरही, गयाना संघ क्वालिफायर 1 मध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. तेथून संघाला अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी असतील. जर संघ क्वालिफायर 1 जिंकला तर त्याला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो. जर तो हरला तर त्याला क्वालिफायर 2 मधील एलिमिनेटरच्या विजेत्याशी सामना करावा लागेल.
हेही वाचा-
टी20 विश्वचषकात भारताची शानदार सुरुवात, सराव सामन्यात वेस्ट इंडिजला नमवले
IRE vs SA: आयर्लंडची ऐतिहासिक कामगिरी; दक्षिण आफ्रिकेची शरणागती
निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी; ट्रॅव्हिस हेडचा इंग्लंडला दणका, मालिका खिश्यात