प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबचा खेळाडू निकोलस पूरन जबरदस्त प्रदर्शन करत आहे. केवळ फलंदाजीतच नव्हे तर त्याने क्षेत्ररक्षणातही शानदार कामगिरी करत, स्वत:ची कुवत सिद्ध केली आहे. त्यामुळे चाहत्यांपासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वांच्या मुखात त्याचे नाव आहे.
नुकत्याच दुबईच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या ३८व्या सामन्यात निकोलसनने आपल्या पंजाब संघाला एकहाती सामना जिंकून दिला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात पूरनने २८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार लगावत सर्वाधिक ५३ धावा केल्या. त्याच्या या अफलातून खेळीमुळे पंदाबने ५ विकेट्सने सामना खिशात घातला.
पंजाबने या हंगामात आतापर्यंत १० सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहेत. तर ६ सामन्यात त्यांना पराभावला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान पूरनने १८३.२२ च्या सरासरीने २९५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे हा २५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज पंजाब संघाचा ‘मॅच विनर’ म्हणून नावारुपाला आला आहे. मात्र याच पूरनवर एकेकाळी बंदी घालण्यात आली होती.
चेंडू छेडछाड प्रकरणामुळे घातले होते प्रतिबंध
आयसीसीने २०१९ साली पूरनवर ४ टी२० सामन्यांसाठी प्रतिबंध लावले होते. वेस्ट इंडिज विरुद्ध अफगानिस्तान संघात झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो चेंडू छेडछाड करताना दोषी सापडला होता. पण त्यानंतर त्याने चाहते आणि क्रिकेट बोर्डाची क्षमा मागितली होती. तसेच भविष्यात अशी चूक न करण्याची हमी दिली होती.
आयपीएल कारकिर्दीतील आकडेवारी
पूरनने २०१९ साली किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो पंजाबचा भाग आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये १७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने ४६३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नवरीच्या हातात बॅट! पाहा नुकत्याच लग्नबंधनात अडकलेल्या महिला क्रिकेटपटूचे स्पेशल ‘वेडिंग फोटोशूट’
‘मॉर्गनची कर्णधार म्हणून झालेली निवड योग्य नाही’, दिग्गज क्रिकेटरने व्यक्त केला संताप
जबदस्त इच्छाशक्ती! एका कानाने ऐकू येत नसतानाही आरसीबीचा ‘हा’ खेळाडू गाजवतोय आयपीएल
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू