---Advertisement---

स्मिथची पाठराखण करणे कोहलीला महागात, या खेळाडूने केली सडकून टीका

---Advertisement---

रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्टिव्ह स्मिथसाठी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले आहे. पण इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटनने विराटवर या घटनेबद्दल टीका केली आहे.

द ओव्हलवर रविवारी पार पडलेल्या या सामन्यात विराट फलंदाजी करत असताना एका वेळी स्मिथ बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी चाहत्यांकडून स्मिथची निंदा केली जात होती.

ते पाहून विराटने व्हॉक्सहॉल एन्डला मोठ्याप्रमाणात उपस्थित असणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या दिशेने टाळ्या वाजवण्यासारखे हातवारे करुन स्मिथची निंदा करण्याऐवजी त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते. विराटची ही खिलाडूवृत्ती पाहून स्मिथनेही विराट जवळ येऊन त्याच्याशी हात मिळवला होता.

पण कोहलीचे हे वागणे कॉम्पटनला पटले नसून त्याने याबद्दल ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘मला वाटते विराट कोहलीला चाहत्यांना वॉर्नर आणि स्मिथला बू(निंदा) करु नका आणि त्याऐवजी टाळ्या वाजवा हे सांगण्याचा हक्क नाही. जर सत्य सांगायचे झाले तर हे उदारपणाचे वाटले.’

कॉम्टनने या ट्विटबरोबर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये त्याने याबद्दलही भाष्य केले आहे. तसेच तो या व्हिडिओमध्ये सामन्याबद्दलही बोलला आहे.

https://twitter.com/thecompdog/status/1138118550143545345

कॉम्पटनच्या या ट्विटमुळे चाहते नाराज झाले असून त्यांनी कॉम्पटनवर टिका केली आहे. त्यामुळे अखेर कॉम्पनने माफी मागणारे दुसरे ट्विट केले आहे.

माफी मागण्याच्या ट्विटमध्ये कॉम्पटनने म्हटले आहे की ‘विराटबद्दल मी केलेल्या कमेंटबद्दल लोकांना चूकीचे वाटले असेल तर मी माफी मागतो. मला खात्री आहे की हे हानीकारक नव्हते आणि त्याचा यामागील हेतू चांगल्याच अर्थाचा असेल. क्रिकेटची मजा घेऊ आणि चाहत्यांना त्यांची मते तयार करु दे. मी तुमच्या मतांचा आदर करतो. हे सर्व मैत्रीपूर्ण ठेवू.’

https://twitter.com/thecompdog/status/1138444297236336642

स्मिथ आणि त्याचा संघ सहकारी डेव्हिड वॉर्नर मागील वर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली होती. पण त्यांची ही बंदी मार्च 2019मध्ये संपली असल्याने या दोघांनीही 2019 विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया संघात पूनरागम केले आहे.

मात्र या दोघांनाही बंदीची शिक्षा पूर्ण केल्यानंतरही चाहत्यांकडून होत असलेल्या निंदेला सामोरे जावे लागत आहे. भारताविरुद्धच्या सामन्याआधीही स्मिथ आणि वॉर्नरची चाहत्यांनी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे खिल्ली उडवली आहे.

https://twitter.com/ICC/status/1137777943667707907

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या कारणामुळे विश्वचषकात पावसामुळे सामना रद्द झाल्यावर नाही राखीव दिवस

जेमतेम १८ वर्षीय मुंबईकर खेळाडूची किया सुपर लीगमध्ये निवड

धोनी आऊट, कोहली कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment