पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 60वर्षांवरील पुरुष गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत दुस-या मानांकित अनिल निगमने अव्वल मानांकीत दिपांकर चक्रवर्तीचा 7-5, 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत तिस-या मानांकीत अर्जुन उप्पलने अव्वल मानांकित रवींद्रनाथ पांडेचा 6-2, 1-6, 10-5 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर केतन धुमाळने सुजय महादेवनचा 6-1, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. 45वर्षांवरील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित नितीन कीर्तनेने गगनदीप वासूचा 6-0, 6-2 असा तर दुस-या मानांकित सुनील लुल्लाने सातव्या मानांकित पराग शहाचा 6-4, 4-6, 10-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
65वर्षांवरील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित योगेश शहानेतिस-या मानांकित राजेंद्र सिंग राठोडचा 6-1, 6-1 असा तर पाचव्या मानांकीत एकनाथ किणीकरने अजितकुमार ब्लावेल्लीचा 7-5, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 35वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्य फेरी:
केतन धुमाळ(भारत)वि.वि.सुजय महादेवन(भारत) 6-1, 6-3
अर्जुन उप्पल(भारत)[3] वि.वि रवींद्रनाथ पांडे(भारत)[1] 6-2, 1-6, 10-5
35 वर्षावरील महिला गट:राउंड रॉबिन:
आरती गणेश(भारत)[2] वि.वि प्रियांका मेहता(भारत)[1] 6-4, 6-3
गायत्री मेवाडा(भारत)वि.वि.प्रणिता पेडणेकर(भारत) 6-1, 6-0
40वर्षावरील पुरुष एकेरी: उप-उपांत्यपूर्व फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.अमित आहेर(भारत) 6-0, 6-1
रवी कोठारी(भारत)वि.वि.सुरेंद्र अल्लम(भारत)[8] 6-4, 1-6, 6-1
मंदार वाकणकर(भारत)[4] वि.वि अमित शिंदे(भारत) 6-0, 6-0
विकास चौधरी(भारत)वि.वि.कमलेश शुक्ला(भारत)[2] 6-0, 6-3
रमजान शेख(भारत)[5]वि.वि.कौस्तुभ देशमुख(भारत) 6-2, 6-0
स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[3]वि.वि.रतिश रतुसारिया(भारत) 6-2, 6-2
बद्री विशाल(भारत)[6] वि.वि आशिष शर्मा(भारत) 6-4, 6-1
नीरज आनंद(भारत)[7]वि.वि.जॉय बॅनर्जी(भारत) 6-1, 6-1
45वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्य फेरी:
नितीन कीर्तने(भारत)[1]वि.वि.गगनदीप वासू(भारत)[11] 6-0, 6-2
सुनील लुल्ला(भारत)[2]वि.वि.पराग शहा(भारत)[7] 6-4, 4-6, 10-4
55वर्षांवरील पुरुष:उपांत्यपूर्व फेरी:
आलोक भटनागर(भारत)वि.वि.पॉल वरघसे(भारत) 7-5, 6-2
आशिष डिके(भारत)[3] वि.वि संजय कालगावकर(भारत) 6-0, 6-1
अजय कामत(भारत)वि.वि.कुलदीप सिंग(भारत)[2] 6-0, 6-0
गजानन कुलकर्णी(भारत)वि.वि.उल्हास फुलझेली(भारत)( सामना रहित)
60वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:
अनिल निगम(भारत)[2] वि.वि दिपांकर चक्रवर्ती(भारत)[1] 7-5, 6-3
65वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
योगेश शहा(भारत)[1]वि.वि.राजेंद्र सिंग राठोड(भारत)[3] 6-1, 6-1
एकनाथ किणीकर(भारत)[5]वि.वि.अजितकुमार ब्लावेल्ली(भारत) 7-5, 6-3
70वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
ताहीर अली(भारत)(1) वि.वि अनिल सौंदत्तीकर(भारत) 6-4,6-3
रामराव दोसा(भारत)(3) वि.वि शिव मोर(भारत)6-1, 6-0
रत्नाकरराव आनी(भारत)[4]वि.वि.फ्रान्सिस रॉड्रिक्स(भारत) 6-2, 6-1
धवल पटेल(भारत)(2) वि.वि यु.एस गुप्ते(भारत) 3-6, 6-0, 10-5
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्यात धावा करण्याची इच्छाही दिसत नाही’, महान क्रिकेटरने विराटच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्न
‘त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास दाखवला नाही’, आरसीबीच्या माजी कर्णधारानं मांडल्या आपल्या भावना
फ्लॉप ठरत असलेल्या विराटला तोंडावर बोलला मॅक्सवेल; म्हणाला, ‘आता मी तुझ्यासोबत बॅटिंग नाही करू शकत’