पुणे। डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या निशित रहाणे, मुंबईच्या अजमीर शेख यांनी, तर मुलींच्या गटात रुमा गायकैवारी यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ उपांत्य फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत निशित रहाणे याने अव्वल मानांकित तेलंगणाच्या तरुण कोरवारचा 6-1, 6-2 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. एकतर्फी लढतीत निशित रहाणेने तरुण कोरवारवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटमध्ये निशितने दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये तरुणची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा सहज जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्येदेखील निशितने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत हा सेट तरुणविरुद्ध 6-2 असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित मुंबईच्या अजमीर शेख याने पुण्याच्या तनिष्क जाधवचा 6-0, 6-2 असा पराभव करतअंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या रुमा गायकैवारी हिने काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या सोलापूरच्या आकृती सोनकुसरेचा 6-4, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या श्रीनिधी बालाजी हिने महाराष्ट्राच्या आस्मि आडकरचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(5) असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अजमीर शेख व साहिल तांबट या अव्वल मानांकित जोडीने पार्थ देवरुखकर व जय पवार यांचा 7-5, 6-3 असा तर, जय दिक्षित व निशित रहाणे यांनी जश शहा व प्रद्युम्न तोमर यांचा 1-6, 6-3, 12-10 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी):
मुले:
निशित रहाणे(महा)वि.वि.तरुण कोरवार(तेलंगणा)[1]6-1, 6-2;
अजमीर शेख(महा)[3]वि.वि.तनिष्क जाधव(महा)6-0, 6-2;
मुली:
रुमा गायकैवारी[1](महा)वि.वि.आकृती सोनकुसरे(महा)6-4, 6-0;
श्रीनिधी बालाजी(कर्नाटक)[3]वि.वि.आस्मि आडकर(महा)6-3, 7-6(5);
दुहेरी: उपांत्य फेरी:
मुले:
अजमीर शेख/साहिल तांबट[1] वि.वि.पार्थ देवरुखकर/जय पवार[4] 7-5, 6-3;
जय दिक्षित/निशित रहाणे वि.वि.जश शहा/प्रद्युम्न तोमर 1-6, 6-3, 12-10;
मुली:
रुमा गायकैवारी/राधिका महाजन[1]वि.वि.मेह्क कपूर/प्रिशा शिंदे 7-6(6), 6-0;
एन हर्षिनी/प्रेशा शंथामूर्ती[2]वि.वि.आस्मि आडकर/श्रीनिधी बालाजी[3] 5-7, 7-6(6), 13-11.
महत्त्वाच्या बातम्या –
राम स्पोर्टिंगवरील विजयाने घोरपडी तमिळ युनायटेड सी गटात अव्वल
मुंबई इंडियन्सचा ‘धोनीसेने’विरुद्ध २० वा विजय! पाहा सीएसकेला सर्वाधिकवेळा कोणी केलय पराभूत