आयपीएल २०२० च्या मोसमातील आता २१ सामने झाले आहेत आणि सर्वच संघांचे किमान ५ सामने खेळून झाले आहे. यादरम्यान गुणतालिकेत अनेक बदल होताना दिसले. सध्या २१ सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे आणि आत्तापर्यंत त्यांच्या संघाला संघमालकिन नीता अंबानी जवळपास प्रत्येक मोसमात मैदानात उपस्थित राहून प्रोत्साहन देताना दिसल्या आहेत. मात्र यंता नीता अंबानी खेळाडूंसह दिसलेल्या नाहीत. पण असे असले तरी त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची नवी कल्पना शोधली आहे. त्या सामन्यानंतर आपल्या संघातील खेळाडूंशी फोनवर बोलून त्यांचे मनोबल वाढवतात.
नुकताच ६ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना झाला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी मोठा विजय मिळवला. तसेच याच सामन्यात कायरन पोलार्ड आणि अनुकुल रॉयने शानदार झेल घेतले. त्यामुळे सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू जेव्हा ड्रेसिंगरुममध्ये गेले तेव्हा नीता अंबांनी यांनी फोनवर खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी त्यांनी पोलार्ड आणि अनुकुल रॉयबरोबरही संवाद साधला. त्यांनी पोलार्ड आणि अनुकुलला झेल घेतल्यानंतर कसं वाटले. यावेळी अनुकुलने छान वाटले असे सांगितले. या क्षणांचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Comment below and complete our dressing room chant!
“MUMBAAAIIIII ______“ 🗣️#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvRR pic.twitter.com/ZaKdGbBqXf
— Mumbai Indians (@mipaltan) October 7, 2020
याआधीही पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी १५० वा सामना खेळला तेव्हा नीता अंबानी यांनी फोन करुन त्याचे अभिनंदन केले होते.
📹 From the #MI Dressing Room: Mrs. Nita Ambani dialled in to congratulate Polly on his 150th @IPL appearance for MI 💙#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @KieronPollard55 @ImZaheer pic.twitter.com/TlQIoAeuTN
— Mumbai Indians (@mipaltan) September 25, 2020
मुंबईने आत्तापर्यंत यावर्षीच्या हंगामात ६ सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहेत आणि २ सामन्यात पराभव पत्करला आहे.