ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतानं युवा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीवर विश्वास ठेवला, ज्यावर तो आतापर्यंत खरा उतरला आहे. नितीशनं पर्थ कसोटीद्वारे भारतासाठी पदार्पण केलं आणि कठीण काळात बॅटनं धावा केल्या. आता ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटीतही तो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी धावून आला.
ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात नितीशनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढवताना वेगवान धावा केल्या. यादरम्यान त्यानं स्कॉट बोलंडविरुद्ध एक उत्कृष्ट षटकार ठोकला. हा षटकार पाहून त्याच्यासोबत क्रीजवर उपस्थित असलेल्या जसप्रीत बुमराह देखील आश्चर्यचकित झाला.
भारतीय संघानं 26व्या षटकात कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली आणि त्यानंतर नितीश रेड्डी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सुरुवातीला त्यानं थोडा वेळ घेतला. मात्र दुसऱ्या टोकाकडून रिषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन स्वस्तात बाद झाल्यानंतर त्यानं आपला झंझावाती खेळ दाखवण्यास सुरुवात केली. नितीशनं आधी मिचेल स्टार्कला डीप एक्स्ट्रा कव्हरवर षटकार मारला आणि नंतर 42व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्कॉट बोलँडविरुद्ध चक्क रिव्हर्स स्कूप शॉटवर षटकार हाणला!
बोलँडनं स्टंपवर लेन्थ बॉल टाकला होता, परंतु नितीशनं आधीच रिव्हर्स स्कूप खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे धाडला. या युवा अष्टपैलू खेळाडूचा हा शॉट पाहून दुसऱ्या टोकाला उपस्थित जसप्रीत बुमराह देखील आश्चर्यचकित झाला होता. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
NITISH KUMAR REDDY HAS ANNOUNCED HIMSELF. ????
– Crazy shots against Starc and Boland. pic.twitter.com/8t5p84xxlT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2024
ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात नितीश रेड्डीनं चांगली फलंदाजी केली आणि भारताची धावसंख्या 150 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एकेकाळी टीम इंडिया 150च्या आता ऑलआऊट होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नितीशनं झटपट धावा करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं. त्यानं 54 चेंडूत 42 धावांची खेळी खेळली, ज्यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
हेही वाचा –
भारताचा पहिला डाव 200च्या आत आटोपला; स्टार्कचा कहर, युवा नितीशचा एकाकी लढा
केएल राहुल आऊट न होताच माघारी परतत होता, अंपायरनं अशाप्रकारे दिला दुसरा चान्स
स्टार गोलंदाजाची दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी, या यादीत तिसऱ्या स्थानी झेप!





