इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत भारतीय संघाने दोन विकेट घेतल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक क्रॉली आणि बेन डकेटने इंग्लंड संघाला चांगली सुरुवात दिली पण दोघेही सेट झाल्याचे दिसत असताना, नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताला मोठे यश मिळवून दिले. यासह नितीश रेड्डीने आपल्या नावावर एक मोठी कामगिरी केली आहे.
नितीश कुमार रेड्डी 2002 नंतर अशा प्रकारे पहिल्या षटकात दोन विकेट घेणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. 2002 नंतर, पुरुषांच्या कसोटी सामन्यांमध्ये डावाच्या पहिल्या षटकात दोनदा विकेट घेण्याचा पराक्रम फक्त दोन भारतीय वेगवान गोलंदाजांनी केला आहे. 2006 मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाणने हॅट्ट्रिक घेतली होती. आज नितीश कुमार रेड्डी असे करणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडसाठी, जॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. नितीश कुमार रेड्डीने त्याच्या पहिल्याच षटकात बेन डकेट (23) यांना बाद करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर, रेड्डी यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला आणि त्याच षटकात जॅक क्रॉली (18) पंतच्या हातून बाद करून भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्यानंतर जो रुट व ओली पाॅप यांनी खेळ सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेट 100+ धावांची भागीदारी केली. पण टी ब्रेक नंतर रवींद्र जडेजाने ओली पाॅपला 44 धावांवब बाद केले.
दिवसाखेर इंग्लंडने 4 विकेट्स गमावून 251 धावा केल्या आहेत. जो रुट (99) बेन स्टोक्स (39) धावांवर नाबाद क्रीझवर आहेत. भारताकडून नितीशकुमार रेड्डीने दोन तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी एक एक विकेट घेतली.




