इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 39वा सामना शनिवारी (दि. 29 एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात दोन्ही संघांच्या तीन खेळाडूंनी मैलाचा दगड पार करत विक्रम केला. कोण आहेत ते तीन खेळाडू आणि काय आहे त्यांचा पराक्रम, चला जाणून घेऊयात…
कोलकाता विरुद्ध गुजरात (Kolkata vs Gujarat) संघातील या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात दोन्ही संघांच्या तीन खेळाडूंनी मैदानात पाय ठेवताच त्यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. ते तीन खेळाडू म्हणजेच केकेआर संघाचे नितीश राणा (Nitish Rana), आंद्रे रसेल (Andre Russell) आणि गुजरात संघाचा राशिद खान (Rashid Khan) होय.
काय आहे विक्रम?
तर विक्रम असा आहे की, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील 39वा सामना खेळण्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच राणा, रसेल आणि राशिदने या सामन्यात एका अनोख्या शतकाचा विक्रम नावावर केला. हा राणा याच्या आयपीएल कारकीर्दीतील 100वा सामना आहे. तसेच, रसेलचा हा कारकीर्दीतील 107वा, तर कोलकातासाठीचा 100वा सामना आहे, तर राशिद खान याचा हा 100वा सामना आहे.
Good luck on your 100th game, @NitishRana_27! 👏 pic.twitter.com/0to8vMViHM
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 29, 2023
वैयक्तिक कामगिरी
राणाच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 100 सामन्यात फलंदाजी करताना 27.75च्या सरासरीने 2414 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 अर्धशतकांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना 9 विकेट्सही नावावर केल्या आहेत.
Have a good outing, Knights! 👊💯#KKRvGT | #AmiKKR | #TATAIPL pic.twitter.com/EIoKXJR1L3
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 29, 2023
याव्यतिरिक्त रसेल हा त्याचा 107वा सामना असून त्यात त्याने 29.36च्या सरासरीने 2143 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 10 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना 94 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
It's official! @rashidkhan_19 is now a centurion in the IPL! 🏏🌟#AavaDe | #TATAIPL 2023 pic.twitter.com/qlTlbHThIL
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 29, 2023
रसेलव्यतिरिक्त राशिद खान याने 100 आयपीएल सामन्यात गोलंदाजी करताना 6.54च्या इकॉनॉमी रेटने 126 विकेट्स नावावर केल्या आहेत. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने विकेट घेतली, तर यामध्ये वाढ होऊ शकते. याव्यतिरिक्त राशिदने फलंदाजी करताना 326 धावाही केल्या आहेत. (nitish rana andre russell and rashid khan achieve this milestone in kkr vs gt match ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो भारतासाठी सर्व क्रिकेट प्रकारात खेळू शकतो’, ‘या’ खेळाडूचे फॅन बनले शास्त्री गुरुजी; जाणून घ्याच
‘जेव्हा 20 वर्षांनंतर हे पाहील…’, धोनीकडून Runout झाल्यानंतर जुरेलची मोठी प्रतिक्रिया, एकदा वाचाच