मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सला या सामन्यात जरी पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांचा मधल्या फळीतील फलंदाज नितीश राणा चर्चेत राहिला. त्याने या सामन्यात शानदार फलंदाजी केली. या दरम्यान त्याच्या एका शॉटने फ्रिजची काचही फोडली.
नक्की झाले काय?
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलकाता संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कोलकाताचा डाव सुरू असताना १३ वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) आला. यावेळी कोलकाताकडून नितीश राणा (Nitish Rana) स्ट्राईकवर होता.
या षटकाच्या पहिलाच चेंडू उमरानने जवळपास ताशी १५० किमी वेगाने टाकला. यावर नितीश राणानेही सडेतोड उत्तर देत थर्ड मॅनच्या दिशेला कट शॉट खेळत षटकार मारला. त्याचा शॉट इतका जोरदार होता की, सनरायझर्स हैदराबादच्या डगआऊटमधील फ्रीजची काच फुटली. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SlipDiving/status/1514985316733829120
व्हिडिओ पाहाण्यासाठी क्लिक करा
हैदराबादने जिंकला सामना
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या होत्या. कोलकाताकडून नितीश राणाने ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार ठोकले. तसेच आंद्रे रसेलने नाबाद ४९ धावांची खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने २८ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या (SRH vs KKR).
त्यानंतर १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून राहुल त्रिपाठी आणि एडेन मार्करम यांनी अर्धशतके झळकावली. त्रिपाठीने ३७ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. तसेच मार्करमने ३६ चेंडून नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने १७.५ षटकात आव्हान पूर्ण केले. कोलकाताकडून आंद्र रसेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल दिल्ली वि. बेंगलोर सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| मुंबई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!