---Advertisement---

पुन्हा एकदा झाला हैदराबादचा ‘सनराईज’, कोलकाताला ७ विकेट्सने नमवत मिळवला सलग तिसरा विजय

On: शुक्रवार, एप्रिल 15, 2022 11:43 PM
Sunrisers-Hyderabad
---Advertisement---

शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) आयपीएल २०२२चा २५चा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने कोलकाताला धूळ चारत ७ विकेट्सने सामना खिशात घातला. यासह त्यांनी हंगामातील सलग पहिले २ सामने गमावल्यानंतर आता सलग तिसरा विजय नोंदवला. हैदराबादच्या विजयात राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी मोलाचा वाटा उचलला. त्रिपाठीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. विलियम्सनने घेतलेला हा निर्णय त्याच्या संघसहकाऱ्यांनी योग्य सिद्ध केला. यावेळी फलंदाजी करण्यास आलेल्या कोलकाता संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या होत्या. कोलकाताचे (Kolkata Knight Riders) १७६ धावांचे हे आव्हान हैदराबादने १७.५ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले.

हैदराबादकडून खेळताना राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३७ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एडन मार्करमनेही (Aiden Markram) मोलाचे योगदान दिले. त्याने ३६ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकाने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्याव्यतिरिक्त कर्णधार केन विलियम्सनने १७ धावा केल्या. तसेच, यष्टीरक्षक निकोलस पूरनने ५, तर अभिषेक शर्माने ३ धावांचे योगदान दिले.

यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने २ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच, पॅट कमिन्सनेही १ विकेट आपल्या खिशात घातली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक धावा केल्या. राणाने ३६ चेंडूंत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५४ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त आंद्रे रसेलने (Andre Russell) गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही दम दाखवला. त्याने गोलंदाजी करताना २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. तसेच, कर्णधार श्रेयस अय्यरने २८ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणालाही १० धावांचा आकडाही पार करता आला नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना टी नटराजनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त उमरान मलिकने २ विकेट्स घेतल्या. तसेच, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सेन आणि जगदीश सुचिथ यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर उडी घेतली. हैदराबाद संघ गुणतालिकेत ६ गुणांसह ७व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच, कोलकाता संघाची घसरण झाली असून ते चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

चहलच्या पत्नीचा ‘बीहू’ डान्स ठरतोय लक्षवेधी; सोबत रियान परागनेही लावले ठुमके, व्हिडिओ जोरदार व्हायरल

‘मुंबई इंडियन्स अजूनही चॅम्पियन आहे…’ पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवचे सडेतोड प्रत्युत्तर

सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज कोण? स्टेनने घेतले बाबर अन् विराटपैकी ‘या’ खेळाडूचे नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---