---Advertisement---

सामन्यानंतर नितीश रेड्डी कुटुंबासोबत, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ

---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात बाॅर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जात आहे. त्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. या दिवशी भारतीय अष्टपैलू खेळाडू ‘नितीश कुमार रेड्डी’ने (Nitish Kumar Reddy) आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. शतक झळकावणाऱ्या नितीशने सामन्याचा तिसरा दिवस संपल्यानंतर आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कुटुंबियांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. नितीशच्या कुटुंबीयांच्या भेटीचा व्हिडिओ ‘बीसीसीआय’ने (BCCI) शेअर केला आहे.

नितीशला भेटल्यानंतर प्रथम आईने त्याला मिठी मारली आणि नंतर भारतीय अष्टपैलू खेळाडूने त्याच्या बहिणीला मिठी मारली. यानंतर तो वडिलांना मिठी मारतो. यावेळी त्याचे वडील मुत्याला रेड्डी खूपच भावूक दिसले. नितीशने शतक झळकावले तेव्हा देखील स्टँडवर उपस्थित असलेले त्याचे वडील खूपच भावूक दिसत होते.

त्यानंतर वडील म्हणाले, “नितीश आज खूप चांगला खेळला. मला खूप अभिमान आहे. आम्ही खूप संघर्ष केला आहे. आम्ही भारतीय संघाचे आभारी आहोत.” पुढे, नितीश यांची बहीण तेजस्वी रेड्डी म्हणाली, “हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. मी एवढेच सांगू शकते की आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे आणि खूप आनंद झाला आहे. त्याला सांगितले आणि त्याने तसे केले.”

सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर नितीशने 176 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 10 चौकारांसह 1 षटकार लगावला. नितीश सोबत मोहम्मद सिराज 2 धावांवर नाबाद माघारी परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ 116 धावांनी मागे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नितीश रेड्डीच्या शतकामागे सिराजची भूमिका महत्त्वाची, 99 धावांवर असताना केला चमत्कार
मूर्खपणा, मूर्खपणा, मूर्खपणा!….या भारतीय खेळाडूवर भडकले सुनील गावस्कर; ड्रेसिंग रुममधून बाहेर करण्याची मागणी
ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय, दिग्गजांच्या लिस्टमध्ये नितीश रेड्डीचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---