आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दशकातील तिन्ही प्रकारच्या संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या तिन्ही संघात भारतीय खेळाडूंचा सहभाग आहे. त्याचबरोबर या तिन्ही संघाच्या कर्णधारपदी भारतीय खेळाडूंची नावे आहेत. मात्र आयसीसीने जाहीर केलेल्या कोणत्याच संघात एकाही पाकिस्तानच्या खेळाडूचा समावेश नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या दशकातील आपले तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ जाहीर केले. या तिन्ही संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे देण्यात आले. यामधे कसोटी संघाचे कर्णधार विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. मात्र वनडे आणि टी-20 संघाचे नेतृत्व माजी भारतीय खेळाडू महेंद्र सिंग धोनी याच्याकडे सोपवले आहे. मात्र या तिन्ही संघात एका ही पाकिस्तानी खेळाडूचा समावेश केला नाही.
आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ
या संघात आयसीसीने दोन भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये कर्णधार म्हणून विराट आणि आर अश्विनची निवड केली आहे. या संघात इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा सहभाग आहे.
आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम टी-20 संघ
या संघात चार भारतीय खेळाडूंचा सहभाग आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान देशाचा प्रत्येकी एक खेळाडू आहे.
आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम वनडे संघ
या संघात तीन भारतीय खेळाडू आहेत. त्याचबरोबर श्रीलंका,न्यूझीलंड, बांगलादेश आणि इंग्लंड देशाचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया देशाचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. मात्र या तिन्ही संघात एका पाकिस्तानच्या खेळाडूचा समावेश नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.
https://twitter.com/satyam_2044/status/1343142748484816896?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1343142748484816896%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fno-pakistani-player-is-the-best-team-of-the-decade-1302589
Pakistani fans after watching the teams of decade #ICCAwards2020 pic.twitter.com/7ZMfmeEbgk
— बेरोजगारmemer (@Unknownmemer6) December 27, 2020
Pak player rn : pic.twitter.com/9IB67I0WdS
— @ (@Meme_Canteen) December 27, 2020
ICC Making team of the Deacde pic.twitter.com/7UFYgiuJ5x
— vijay (@puntasticVU) December 27, 2020
#ICCAwards2020
We Indians after knowing none of Pakistani player nominated in ICC decade player list pic.twitter.com/KwtBOu6S7o— SAHIL³ (@Sa_hil0) December 27, 2020
आयसीसी कसोटी संघ:
विराट कोहली (कर्णधार) डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, एॅलिस्टर कुक, केन विलियम्सन, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर अश्विन, जेम्स अँडरसन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड
आयसीसी वनडे संघ:
महेंद्र सिंग धोनी (कर्णधार) रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिविलियर्स, शाकीब अल हसन, बेन स्टोक्स, ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा
आयसीसी टी-20 संघ :
महेंद्र सिंग धोनी (कर्णधार) रोहित शर्मा, ख्रिस गेल, एराॅन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
संबधित बातम्या:
– आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कोहलीच किंग; या भारतीय फिरकीपटूलाही मिळाले स्थान
– कॅप्टनकूल धोनीची बाजी! टी२० पाठोपाठ आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे संघाचाही कर्णधार
– दशकातील सर्वोत्तम आयसीसी महिला वनडे आणि टी२० संघ जाहीर, मितालीसह ‘या’ भारतीयांना मिळाले स्थान