---Advertisement---

‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ

On: मंगळवार, जुलै 6, 2021 12:29 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक मोठ मोठया मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. परंतु विराट आणि शास्त्री या कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या जोडीला अजूनपर्यंत एकदाही आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाही.

नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विराटच्या नेतृत्वाखाली आणि शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाखाली आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची सुवर्ण संधी होती. परंतु, या सामन्यात देखील भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना त्यांच्या पदावरून काढून टाकावे अशी मागणी करण्यात आली. याबाबत माजी भारतीय दिग्ग्ज कर्णधार कपिल देव यांनी आपले मत मांडले आहे.

असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात येऊ शकते. राहुल द्रविड सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

अशातच कपिल देव यांनी म्हटले की, ‘मला नाही वाटत की, याबाबत चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे. आधी श्रीलंकेत कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नवीन प्रशिक्षक घडवणे चुकीचे नाही, परंतु रवी शास्त्री जर चांगली कामगिरी करत असतील तर त्यांना काढून टाकण्याचे काही कारण नाही. या गोष्टींमुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांवर नको असलेला दबाव निर्माण होत असतो.’ (no reason to remove ravi shastri if he is doing well says kapil dev )

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्या २ कसोटी मालिका 

रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये २ वेळा कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तसेच भारतीय संघ २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पोहोचला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड संघाविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली मर्यादीत षटकांचा भारतीय संघ श्रीलंकेत जुलैमध्ये वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

आयपीएल नव्हे, तर ‘या’ टी२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार पठाण बंधू

महिलांच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीपूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली ‘ही’ विशेष मागणी

फेडररचा ‘मोठा’ विक्रम! विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा ठरला सर्वात वयस्कर टेनिसपटू 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---