भारतीय संघात अनेक खेळाडू आत-बाहेर होत असतात. काही त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य राखत संघामध्ये आपले स्थान टीकून ठेवतात. तो खेळाडू यष्टीरक्षक-फलंदाज असला तर त्याला फार कमी संधी मिळतात असे दिसून आले आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हे मोठे नाव त्यात सामील आहे. त्याने २०१९च्या विश्वचषकानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याच्याप्रमाणेच संजू सॅमसन (Sanju Samson) यालाही संघात जागा मिळाली आहे. मात्र तो संघात टीकून राहण्यात अपयशी ठरत आहे. यामागचे महत्वाचे कारण भारताच्या दिग्गजाने स्पष्ट केले आहे.
भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सॅमसनला भारतीय संघात जागा कायम करण्यात का अडचण येते याचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले, “संजू एक उत्तम खेळाडू आहे यात शंकाच नाही. पण तो फलंदाजी करताना शॉट सिलेक्शनमध्ये चूक करतो. यामुळेच तो भारतीय संघात टिकून राहत नाही.”
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात सॅमसनने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. त्याने संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. राजस्थान १४ वर्षानंतर प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्याची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघात निवडले जाणार अशी चर्चा होत होती. मात्र त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. केरळच्या या खेळाडूची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे भारत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली २६ आणि २८ जूनला दोन टी२० सामने खेळणार आहे.
आयपीएलच्या मागील दोन हंगामात सॅमसनची बॅट तळपली आहे. त्याने २०२२च्या हंगामात १४६च्या स्ट्राईक रेटने ४५८ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळेही त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघात निवड झाली नव्हती. त्याच्याऐवजी रिषभ पंत आणि कार्तिकला संधी मिळाली होती.
गावसकर स्टार स्पोर्ट्शी सॅमसनविषयी बोलताना म्हणाले, “सगळ्याच खेळाडूंना वाटते की त्याला संधी मिळावी, त्यातील फक्त काहीच त्या संधीचा फायदा घेत स्वतला सिद्ध करतात. संजू एक चांगला खेळाडू आहे. त्याला आपल्या शॉट सिलेक्शनवर थोडे काम करण्याची आवश्यकता आहे.”
“सॅमसनला पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्याची सवय आहे. तो आंतरराष्ट्रीय सामन्यातही असाच खेळाला सुरूवात करतो. यावेळी त्याने प्रकाश आणि खेळपट्टीचा अंदाज लावत सुरूवातीलआ संथ गतीने खेळावे. थोडा जम बसला आणि अचूक शॉट खेळले तर त्याच्या बॅटमधून अधिक धावा बाहेर पडतील,” असेही गावसकर पुढे म्हणाले आहेत.
सॅमसनने वर्षाच्या सुरूवातीला संघात जागा निर्माण केली होती. तो श्रीलंके विरुद्ध टी२० सामन्यातून संघात परतला होता. त्याच्या फलंंदाजीचे कौतुक कर्णधार रोहित शर्मा यानेही केले आहे. त्याचे बॅकफूट चांगले असून तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी तेथील चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्टीसाठी तो उत्कृष्ट खेळेल, असे मत असे रोहितने मांडले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा झटका!, दिग्गज अष्टपैलू खेळाडूने जाहिर केली क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
IND vs ENG । इंग्लंडचा कर्णधार कोरोनाच्या विळख्यात?, पहिल्या सराव सत्राला होता अनुपस्थित
रोहित-विराटला ‘ही’ चूक चांगलीच भोवली, बीसीसीआयने फटकारल्याने दोघांच्या अडचणीत वाढ