---Advertisement---

आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ: पाकिस्तानच्या हसन अलीसह ‘या’ खेळाडूंना मिळाले नामांकन

On: मंगळवार, जून 8, 2021 6:05 PM
Hasan-ali
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)तर्फे दरमहा, क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना ‘प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार दिला जातो. त्याच अंतर्गत आयसीसीने मे महिन्याच्या पुरस्कारासाठी ३ पुरुष आणि ३ महिला क्रिकेटपटूंची नामांकने जाहीर केली आहेत.

आयसीसीने जाहीर केलेल्या पुरुष क्रिकेटपटूंच्या यादीत पाकिस्तान संघाचा हसन अली, श्रीलंका संघाचा प्रवीण जयविक्रमा आणि बांगलादेश संघाचा मुशफिकुर रहिम यांचा समावेश आहे. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्रेस, आयर्लंडची क्रिकेटपटू गॅबी लुईस आणि लीह पॉल यांना नामांकन मिळाले आहे.

https://twitter.com/ICC/status/1402177569395556354?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1402177569395556354%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-the-icc-mens-player-of-the-month-nominees-for-may-are-in-hasan-ali-praveen-jayawickrama-mushfiqur-rahim-4102919.html

हसन अली याने नुकतेच झिम्बाब्वे संघाविरुद्ध कसोटी मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या मालिकेत त्याने ८.९२ च्या सरासरीने १४ गडी बाद केले होते. तसेच श्रीलंकन संघाचा गोलंदाज प्रवीण याने बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ११ गडी बाद केले होते. याच कामगिरीच्या जोरावर श्रीलंका संघाने बांगलादेश संघावर  २०९ धावांनी विजय मिळवला होता. तसेच बांगलादेश संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिम याने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत ७९ च्या सरासरीने २३७ धावा केल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याला मे प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर कॅथरीन ब्रेसने टी -२० क्रिकेटमध्ये ८५.१ च्या स्ट्राइक रेटने ९६ धावा केल्या आहेत. यासोबतच तिने १४.६० च्या सरासरीने पाच गडी बाद केले आहे. तसेच गॅबी लुईसने ११६ च्या स्ट्राइक रेटने ११६ धावा केल्या आहेत. तसेच लीह पॉलने ४.४४ च्या सरासरीने ९ गडी बाद केले आहेत. नामांकित खेळाडूंसाठी मतदान सुरू आहे. भारतीय संघाने मे महिन्यात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. त्यामुळे भारतीय खेळाडूंना नामांकन मिळाले नाही.

महत्वाच्या बातम्या:

धोनीच्या फार्महाउसची करा घरबसल्या सैर, पत्नी साक्षीने शेअर केले फोटो

धवन-द्रविडची जोडी करणार लंकादहन, असा असेल उर्वरित संघ

फ्रेंच ओपन: जोकोविच, नदालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, तर बोपण्णाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---