मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या कसोटीत भारताने ८ विकेट्सने शानदार विजय मिळवला. भारताच्या या विजयात प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने मोलाचे योगदान दिले. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा केल्या. या विजयामुळे रहाणेचे शतक भारतासाठी लाभदायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
रहाणेने या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात २२३ चेंडूत ११२ धावा केल्या. यात त्याच्या १२ चौकारांचा समावेश आहे. हे रहाणेचे कसोटी कारकिर्दीतील १२ वे कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे रहाणेची आत्तापर्यंतची कसोटी शतके नेहमीच भारताच्या पथ्यावर पडली असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहेय
रहाणेने याआधी केलेल्या १२ कसोटी शतकांपैकी एकही शतक भारताचा पराभव झालेल्या सामन्यातील नाही. म्हणजेच त्याने केलेल्या ९ शतकांनंतर भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर त्याची ३ शतके अनिर्णीत राहिलेल्या सामन्यातील आहे.
या सामन्यात रहाणेने केलेल्या या शतकामुळे भारताला पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेण्यात यश आले होते. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवरच रोखला. त्यामुळे माफक ७० धावांचे आव्हान भारताने सहज पार करत सामना जिंकला. यावेळी रहाणेने शुबमन गिलसह अर्धशतकी भागीदारी केली. त्याचबरोबर या सामन्यातील विजयी धावही रहाणेनेच घेतली. रहाणेने केलेल्या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
बुम बुम बुमराह! परदेशातील खेळपट्टींवर बुमराहने केलेल्या अफलातून कामगिरीची आकडेवारी
क्या बात अज्जू! ‘जॉनी मुलाघ मेडल’ जिंकणारा अजिंक्य रहाणे ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू
सगळ्या धावा एकीकडे आणि ती एक धाव एकीकडे! रहाणेने घेतलेली विजयी धाव ‘या’साठी आहे खास