पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याला “स्विंगचा सुलतान” म्हणूनही ओळखले जाते. कारण त्याची स्विंग गोलंदाजी उत्कृष्ट होती. वसीम अक्रमने पाकिस्तानसाठी अनेक विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. वसीम अक्रमची स्विंग गोलंदाजी, विशेषत: रिव्हर्स स्विंग, हा क्रिकेटमधील एक मोठा अध्याय आहे. त्याच्यासारखी स्विंग गोलंदाजी हे आजही गोलंदाजांसाठी मोठे आव्हान आहे.
वसीम अक्रमने बाबर आझम किंवा मोहम्मद रिझवान यांना पाकिस्तान क्रिकेटसाठी भविष्यातील सुपरस्टार म्हणून नाव दिले नाही. परंतु या वेगवान गोलंदाजांचा वर्णन पाकिस्तान संघासाठी सर्वात हुशार खेळाडू आणि एक अमूल्य स्टार म्हणून केले आहे. तसेच, पाकिस्तान क्रिकेट विशेषतः वेगवान गोलंदाजीसाठी लक्षात ठेवले जाते. ज्यामध्ये इम्रान खान, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे.
आता वसीम अक्रमने पाकिस्तानसाठी सर्वात खास आणि महत्त्वाचा वेगवान गोलंदाज म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीचे वर्णन पाकिस्तान संघाचा पुढचा सुपरस्टार म्हणून केले आहे. तो पाकिस्तान क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायची क्षमता त्याच्यात आहे.
शाहीन त्याच्या स्विंग आणि यॉर्कर्स गोलंदाजीसाठी ओळखला जातो. शाहीन पाकिस्तानकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी20) खेळतो. त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने पाकिस्तानला अनेक सामने जिंकण्यास मदत केली आहे. शाहीन आफ्रिदीने फार कमी वेळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत, ज्यामुळे तो पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा खेळाडू मानला जातो.
हेही वाचा-
‘सराव न करता बांग्लादेश मालिका…’, रोहित-विराटच्या विश्रांतीवर गावस्कर संतापले
‘बाबर आझमसारखा छंद..’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने जसप्रीत बुमराहला दिला सल्ला
‘मी देशाचा सर्वोत्कृष्ट स्पिनर…’, गुजरातच्या स्टारचे बीसीसीआयला आव्हान?