क्रिकेट हा खेळ जगभरात प्रसिद्ध आहे. सामान्य व्यक्तींपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला कुठला ना कुठला क्रिकेटपटू आवडतो. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याच्या नावाचाही समावेश आहे. सुनील शेट्टीला क्रिकेट किती आवडते, ही गोष्ट कुणापासूनही लपलेली नाहीये. तो नेहमीच सोशल मीडियावर भारतीय संघाचे कौतुक करताना दिसतो. अनेकदा तो सामन्यांनाही हजेरी लावतो. सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी हिचे भारतीय स्टार क्रिकेटपटू केएल राहुल याच्याशी लग्न झाले आहे. अशात सुनील शेट्टीने त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. विशेष म्हणजे, तो खेळाडू राहुल नाहीये.
केएल राहुल नाही, ‘हा’ खेळाडू सुनील शेट्टीचा आवडता
हैराण करणारी बाब म्हणजे, केएल राहुल (KL Rahul) याला सुनील शेट्टी (Suniel Shetty) आवडता क्रिकेटपटू मानत नाही. त्याने अलीकडेच आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव सांगितले आहे. सुनील शेट्टी याच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव सांगितले.
सुनील शेट्टीने आवडत्या खेळाडूचे नाव सांगताना म्हटले की, “सध्याच्या भारतीय संघातील माझा आवडता खेळाडू विराट कोहली आहे. कारण, तो चेज मास्टर आहे.”
Sunil Shetty said, "KL Rahul is my son, but Virat Kohli is definitely my favourite cricketer. He is a master of chasing". pic.twitter.com/l02Mnk9DI0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 31, 2023
सुनील शेट्टीचे हे विधान ऐकून त्याची पत्नी निहारिकाही हैराण झाली. तिने विचारले की, तुम्ही असे का म्हटले? यावर अभिनेता म्हणाला की, “केएल राहुल माझा मुलगा आहे आणि तुला माहितीये की, जेव्हा गोष्ट कुटुंबाची असते, तेव्हा तुम्ही त्यात आवड-निवड बाजूला ठेवता. माझ्यासाठी आहान आणि केएल दोघेही मुलेच आहेत.”
याच वर्षी झाले अथिया आणि राहुलचे लग्न
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी जानेवारी 2023मध्ये लग्न केले होते. राहुल आणि अथियाचे लग्न सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसमध्ये झाले होते. या लग्नात जवळपास 100 पाहुण्यांचा समावेश होता. राहुल आणि अथियाचे लग्न दक्षिण भारतीय थीममध्ये आयोजित केले होते. तसेच, या लग्नात पाहुण्यांसाठी दक्षिण भारतीय पदार्थांचा समावेश होता.
राहुलची विश्वचषकातील कामगिरी
विश्वचषक 2023 स्पर्धेत राहुलने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यात राहुलने 108च्या सरासरीने 216 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 अर्धशतकही झळकावले आहे. नाबाद 97 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. (not kl rahul but this player is sunil shettys favorite player read here)
हेही वाचा-
शमीच्या दोनच सामन्यातील कामगिरीने ऑस्ट्रेलियन दिग्गज इम्प्रेस, म्हणाला, ‘शमीने आता सिराजची…’
ऑस्ट्रेलियासाठी 526 विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची भविष्यवाणी; म्हणाला, भारत आणि ‘या’ संघात होणार वर्ल्डकप फायनल