भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिने तिच्या दोन आवडत्या क्रिकेटपटूंबद्दल खुलासा केला आहे. वास्तविक, मंधाना सध्या महिला आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला गेली आहे. भारताने पहिला सामना जिंकला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तानी महिला संघाचा 7 गडी राखून पराभव करत पहिला विजय संपादन केला आहे. आता भारतीय महिला संघ आपला पुढचा सामना यूएई विरुद्ध खेळणार आहे. भारत आणि यूएई यांच्यातील सामना 21 जुलै रोजी होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय महिला संघ उपांत्य फेरी गाठू शकतो.
त्याचवेळी, या सामन्यापूर्वी, मंधानाच्या आवडत्या क्रिकेटरशी संबंधित प्रकरण समोर आले आहे. मंधानाचे आवडते क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा नाहीत तर श्रीलंकेचा महान यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा आणि महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आहेत. याशिवाय मंधानाची आवडती ॲथलीट दुसरी कोणी नसून सेरेना विल्यम्स आहे.
I missed these kinds of graphics in cricket.
– Need in Men’s cricket as well in ICC tournaments. pic.twitter.com/kZesJltDN7
— Johns. (@CricCrazyJohns) July 19, 2024
भारतीय महिला संघ महिला आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात यूएई विरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. त्याआधी भारतीय संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटील बोटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मंधानाने 45 धावांची शानदार खेळी केली होती. मागील 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मंधानाने 41.43 च्या सरासरीने 290 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत आजच्या सामन्यात पुन्हा एकदा मंधानाची बॅट बोलणार का हे पाहणे महत्त्वाचे राहील.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे स्पर्धे बाहेर…
हरमनप्रीत कौरला मागे टाकत ‘स्टार’ खेळाडू स्म्रीती मानधनानं रचला इतिहास!
रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची सोडणार साथ! अहवालात धक्कादायक खुलासा