आजकाल माजी क्रिकेटपटूंना सध्याच्या काळातील आवडता खेळाडू कोण असा प्रश्न विचारल्यावर रोहित शर्मा, विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ, केन विलियम्सन अशी उत्तरे मिळतात. पण वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी यापेक्षा वेगळे उत्तर दिले आहे. त्यांनी भारताचा फलंदाज केएल राहुलचे नाव घेतले आहे.
स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार लारा यांनी सांगितले, ‘मी वेस्ट इंडिज क्रिकेटला फॉलो करतो, त्यांनी नुकतेच श्रीलंकेत टी२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. जगात अनेक चांगले फलंदाज आहेत. त्यात स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली, रोहित शर्मा आहे. मला केएल राहुल आवडतो.’
राहुल सध्या जबरदस्त लयीत आहे. त्याने मागील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यात झालेल्या मर्यादीत षटकांच्या मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेत शतकही केले होते. त्याचबरोबर त्याने यावेळी यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळली होती.
आता तो १२ मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसेल.
लारा यांनी क्रिकेट इतिहासात अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये केलेला ४०० धावांच्या सर्वोच्च खेळीचा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. सध्या लारा रोड सेफ्टी टी२० सिरिज खेळण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी या मालिकेतील पहिलाच सामना इंडियन लिजंड्स विरुद्ध खेळताना १५ चेंडूत १७ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–…तर आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन संघांचे सामने होऊ शकतात रद्द
–खेळाडूला नाही तर चक्क अंपायरला दुखापतीमुळे पडावे लागले सामन्यातून बाहेर
–दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू वाढवणार भारताचे टेंशन