नुकतीच वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलिया ओपन पार पडली. रविवारी यानिस सिनर या इटलीच्या टेनिसपटूने पुरुष एकेहीत ऑस्ट्रेलिया ऑपिनचे ग्रँड स्लॅम जिंकले. यावर्षी ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. नोवाक जोकोविच या सर्वोत्तम टेनिसपटूला उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याची वेळ आला. आता राजकीय वर्तुळात देखील नोवाक जोकोविचची चर्चा होताना दिसत आहे.
राजकीय वर्तुळात नोवाक जोकोविच () चर्चेत येण्यामागे कारण ठरत आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्र एम.के. स्टॅलिन. सद्या स्पेनच्या दौऱ्यावर असणारे स्टॅलिन विमानप्रवासात नोवाक जोकोविच याला भेटल्याचे समोर येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती सर्वांसोबत सेअर केली. जोकोविच आणि स्टॅलिन फोटोसाठी पोज देताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Surprise in the skies: Met #Tennis legend @DjokerNole en route to #Spain! 🎾 pic.twitter.com/VoVr3hmk5b
— M.K.Stalin (@mkstalin) January 29, 2024
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन () नेहमीच क्रीडाजगताशी संबंधित राहिले आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणारा एमएस दोनी स्टॅलिनचा आवडता खेळाडू आहे. स्टॅलिननेही याविषयी काही वेळा भाष्य केले आहे. अनेकदा त्यांनी तामिळनाडूचा दत्तकपूत्र म्हणून धोनीचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सर्बियाचा जोकोविच उपांत्य सामन्यात पराभूत झाला. जोकोविचने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये आतापर्यंत 10 वेळा पुरुष एकेरीत ग्रँड स्लॅम जिंकला आहे. यावेळी तो या स्पर्धेतील 11वे, तर एकंदरीत 25वे ग्रँड स्लॅम जिंकण्याची शक्यता चाहत्यांना होती. पण उपांत्य सामन्याच यानिस सिनरने त्याला 6-1, 6-2, 6-7(6), 6-3 असा पराभव दिला. अंतिम सामन्याद तेखी सिनरने डेनिल मेदवेदेवला 3-6,3-6,6-4, 6-4, 6-3 असे पराभूत केले आणि कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जिंकले.
(Novak Djokovic and Tamil Nadu Chief Minister M. K. Stalin met)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! जडेजासह हा फलंदाज संघातून बाहेर, दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआयने सरफराजला दिली संधी
‘हे बास का?’ वेस्ट इंडीजच्या कर्णधाराने माजी दिग्गजाला दाखवला बायसेप, जाणून घ्या कारण