युएस ओपनच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने जपानच्या केइ निशिकोरीला 6-3, 6-4, 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तो अर्जेंटीनाच्या जुआन मार्टीन डेल पोट्रो विरुद्ध खेळणार आहे.
जोकोविचने यावर्षीच विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले असून तो त्याची 8वी युएस ओपनची अंतिम फेरी खेळणार आहे. तसेच जर जोकोविचने हा अंतिम सामना जिंकला तर तो पीट सॅम्प्रसच्या सर्वकालीन 14 ग्रॅंड स्लॅमची बरोबरी करेल. या यादीत रॉजर फेडरर (20) आणि राफेल नदाल (17) यांचाही समावेश आहे.
Staying cool:@DjokerNole is appearing in his 11th #USOpen semifinal, second-most behind Jimmy Connors…#USOpen pic.twitter.com/h6cXsDcG03
— US Open Tennis (@usopen) September 8, 2018
दोन वेळचा चॅम्पियन असलेला जोकोविचला या स्पर्धेत 6वे मानांकन मिळाले होते. दोन तास 23 मिनिटे चाललेला या सामन्यात त्याने पहिल्या सेटपासूनच आपले वर्चस्व ठेवले होते.
निशिकोरीने दुसऱ्या सेटमध्ये चांगली सुरूवात केली पण जोकोविच हा उत्तम लयीत होता. त्याने 3-2 अशी आघाडी घेत तो सेट सहज जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये निशिकोरीने आत्मविश्वासाने खेळायला सुरूवात केली पण यावेळी त्याने 4 अनफोर्स्ड एरर (स्वत:हच्या चुकीने प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण मिळणे) केल्या. तसेच या सामन्यात निशिकोरीने एकूण 51 अनफोर्स्ड एरर केल्या.
जोकोविच मागील हंगामात हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. मात्र यावेळी त्याने पुनरागमन करताना अंतिम फेरी गाठली.
जोकोविच आणि निशिकोरी 18 वेळा आमने-सामने आले असून यामध्ये 16 सामन्यात विजय मिळवत जोकोविच आघाडीवर आहे.
रविवारी (9 ऑगस्ट) होणाऱ्या अंतिम सामन्यात जोकोविच आणि डेल पोट्रो हे व्यांदा 19आमने-सामने येत असून मागील 18 पैकी 14 सामन्यात जोकोविचने विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–युएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश
–एशिया कपमध्ये गतविजेत्या टीम इंडियाला अन्य संघापेक्षा मिळणार विशेष वागणुक
–Video: मैदानावर ठेका धरणाऱ्या शिखर धवनने भज्जीलाही केले भांगडा करण्यास प्रोत्साहित