भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी आता क्रिकेटपाठोपाठ आपला मोर्चा फुटबॉलकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी ते इंग्लंडमधील प्रतिष्ठित लिव्हरपूल फुटबॉल क्लब खरेदी करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता ती चर्चा मागे पडली असून, इंग्लंडमधीलच दुसरा एक ताकदवान संघ आर्सेनल फुटबॉल क्लब घेण्यासाठी ते इच्छुक असल्याचे सांगितले जातेय. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आकाश हा या क्लबचा मोठा चाहता आहे.
जगातील आठवे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी लिव्हरपूल क्लब खरेदी करणार अशी चर्चा जोरात सुरू होती. मात्र, काही कारणास्तव हा सौदा झाला नसल्याचे सांगितले जाते. तसेच, मँचेस्टर युनायटेडचे मालक असलेल्या ग्लेझर्स कुटुंबाचे समभाग अंबानी हे घेणार असल्याचे देखील वृत्त समोर आलेले. मात्र, आता या सर्व शक्यता मागे पडल्या आहेत.
उत्तर इंग्लंडमधील आर्सेनल फुटबॉल क्लबचे सहसंघमालक असलेले क्रोएन्को स्पोर्ट्स अँड इंटरटेनमेंट ही कंपनी आपले समभाग विकत आहे. त्यामुळे तब्बल 280 कोटी इतक्या किमतीचे हे समभाग अंबानी घेऊ शकतात. मुकेश अंबानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आकाश हे या फुटबॉल क्लबचे मोठे चाहते असून, त्यांनीच यासाठी जंग जंग पछाडल्याचे सांगितले गेले. हा करार पूर्णत्वास गेल्यास, वेंकीज समूहानंतर मोठा इंग्लिश फुटबॉल क्लब खरेदी करणारे अंबानी दुसरे भारतीय ठरतील. पोल्ट्री व्यवसायातील मोठे नाव असलेल्या व्यक्ती समूहाने 2010 मध्ये ब्लॅकबर्न रोव्हर्स संघ खरेदी केलेला.
अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, युएईतील एमआय एमिरेट्स व दक्षिण आफ्रिकेतील एमआय केपटाऊन या संघाची मालकी आहे. तसेच एमआयजी रिलायन्स हे भारतातील सर्वात मोठी फुटबॉल लीग असलेल्या इंडियन सुपर लीगचे आयोजन करतात.
( Now Mukesh Ambani Showing Interest In Own Arsenal Football Football Club)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिंताजनक! विकेटकीपिंग करताना पाकिस्तानी खेळाडूला दुखापत, डोक्याला चेंडू लागल्यानंतर स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर
चट्टोग्राममध्ये पूर्ण पाच दिवसांचा खेळ होईल? जाणून घ्या खेळपट्टी, हवामानासह सर्व काही