Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आता तुम्ही कारणे नाही देऊ शकत”, आयसीसी ट्रॉफीच्या दुष्काळाबाबत दिग्गजाने टोचले टीम इंडियाचे कान

February 27, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team India

Photo Courtesy:bcci.tv


भारतीय क्रिकेट संघाची गणना नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांमध्ये होते. भारतीय संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये सातत्याने शानदार कामगिरी करताना दिसतो. मात्र, आयसीसी ट्रॉफीमध्ये भारताची कामगिरी अखेरच्या क्षणी खराब झालेली दिसून येत आहे. मागील दहा वर्षात भारताने कोणतीही आयसीसी ट्रॉफी पटकावलेली नाही. भारतीय संघाच्या याच कमजोरीबाबत आता माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने मोठी प्रतिक्रिया दिली.

भारतीय संघाने अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकून आता दहा वर्षांचा काळ झाला आहे. एमएस धोनी याच्या नेतृत्वात भारताने 2013 चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली होती. त्यानंतर भारताचे तीन कर्णधार बदलले गेले. मात्र, आयसीसी ट्रॉफीच्या उपांत्य अथवा अंतिम फेरीत भारतीय संघ चुकताना दिसला. 2023 मध्ये भारताला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये का अपयशी ठरतो याबाबत बोलताना हरभजन सिंग एका कार्यक्रमात म्हणाला,

“आपला संघ मजबूत असतो. मात्र, द्विपक्षीय मालिका व आयसीसी स्पर्धा यामध्ये फरक आहे. तिथे तुम्हाला अधिक दबावाचा सामना करावा लागतो. सर्वच खेळाडू हा दबाव झेलू शकतात असे नाही. आधी रोहित शर्मा व विराट कोहली हेच वरिष्ठ खेळाडू म्हणून ही जबाबदारी सांभाळत. मात्र, आता संघात असे अनेक खेळाडू आहेत. एक समतोल संघ असतानाही तुम्ही आयसीसी स्पर्धा न जिंकल्यास त्याची कारणे द्यायला नाही हवीत.”

भारतीय संघाला यावर्षी जून महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी असेल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतच वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार‌ आहे. त्यामुळे भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपू शकतो.

(Now Team India Have No Reasons After Not Winning ICC Trophy Harbhajan Singh Slams)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वरळीचे छपरी! श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, कॅप्शन वाचाच
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका! तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसह वनडे संघातून पॅट कमिन्स घेणार माघार?


Next Post
Steve-Smith

इंदोर कसोटीआधी स्मिथ काढतोय जीव! दोन पराभवांचे उट्टे काढण्यासाठी आखली रणनीती

Photo Courtesy: Twitter/ICC

भारतीय WPL मध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा! पाचपैकी तीन कर्णधार विश्वविजेत्या संघातील, या संघांनी सोपवली जबाबदारी

Team india (Ranadeb Bose)

दुर्दैवी! टीम इंडियात सिलेक्ट होऊन एकही सामना खेळायला न मिळालेले 5 दुर्दैवी क्रिकेटर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143