न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे आणखी तीन खेळाडू मंगळवारी (१ डिसेंबर) कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याचे वृत्त आहे.
मागील महिन्यात न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यानंतर आतापर्यंत पाकिस्तानच्या एकूण ५३ सदस्यांपैकी १० जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंना हॉटेलसोडून सराव करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
मागील आठवड्यातच पाकिस्तान संघाला न्यूझीलंड आरोग्य अधिकाऱ्यांकडून क्वारंटाईन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यामुळे इशारा देण्यात आला होता. सोमवारी (३० नोव्हेंबर) पाकिस्तानी संघातील ४६ सदस्यांची यापूर्वी कोविड-१९ ची चाचणी घेण्यात आली होती. त्यात ते निगेटिव्ह आले होते.
आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने तिघांचीही पीसीआरची पॉझिटिव्ह चाचणी आल्याची पुष्टी केली. पाकिस्तान संघाला १८ डिसेंबर ते ७ जानेवारी यादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज