कसोटी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा प्रकार आहे. यामध्ये 5 दिवसांच्या सामन्यात खेळताना खेळाडूंचा कस लागतो. इतर क्रिकेट प्रकारासारखीच कसोटीतील प्रत्येक धाव महत्त्वाची असते. सुरुवातीला याचं फार काही वाटत नाही. परंतु सामना जस-जसा शेवटाकडे जातो, तस-तसा त्या धावेची आवश्यकता भासत जाते. असेच काहीसे इंग्लंड संघालाही वाटले असावे. मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघ आमने-सामने होते. या संघांमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने अवघ्या एक धावेने विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, कसोटीत अवघ्या एक धावेने आतापर्यंत किती संघ विजयी झालेत, याबाबत आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंडचा दमदार विजय
न्यूझीलंडने सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 435 धावा चोपल्या आणि डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघाला सर्व विकेट्स गमावत फक्त 209 धावाच करता आल्या. त्यानंतर इंग्लंडकडून फॉलोऑन घेत न्यूझीलंड फलंदाजीला उतरला. यावेळी न्यूझीलंडने हार मानली नाही. त्यांनी यावेळी प्रयत्नांची पराकाष्टा करत सर्व विकेट्स गमावत 483 धावा कुटल्या. तसेच, इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले.
पहिल्या डावात 400 धावांचा आकडा पार करणाऱ्या इंग्लंड संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना अपयश आले. यावेळी न्यूझीलंडकडून 74वे षटक नील वॅगनर (Neil Wagner) टाकत होता. तसेच, स्ट्राईकवर जेम्स अँडरसन (James Anderson) होता. वॅगनरच्या पहिल्या चेंडूवर अँडरसनला धाव घेता आली नाही. त्यानंतर दुसरा चेंडू टाकताच अँडरसनच्या बॅटची कड घेत चेंडू थेट यष्टीरक्षण करत असलेल्या टॉम ब्लंडेल (Tom Blundell) याच्या हातात गेला. अशाप्रकारे अँडरसन बाद होताच ऑस्ट्रेलियाचा डाव 256 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना सामना एक धावेने गमवावा लागला.
Incredible scenes at the Basin Reserve. A thrilling end to the 2nd Test in Wellington 🏏 #NZvENG pic.twitter.com/tyG7laNtdP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 28, 2023
वेस्ट इंडिजने मिळवलेला 1 धावेने विजय
न्यूझीलंडपूर्वी कसोटीत 1 धावेने विजय मिळवण्याची कामगिरी फक्त एकदाच घडली होती. 1993मध्ये सिडनी येथे वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies v Australia) संघ आमने-सामने होते. यादरम्यान वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 1 धावेने पराभूत केले होते. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 252 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 213 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर 39 धावांची आघाडी घेत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 146 धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला 185 धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 184 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे हा सामना वेस्ट इंडिजने 1 धावेने खिशात घातला होता. (nz vs eng One-run win in Test cricket know here)
कसोटीत एका धावेने विजय मिळवणारे संघ
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 1993
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, वेलिंग्टन, 2023
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कहर! एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद, 12 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं
फाॅलोऑन मिळाल्यानंतरही न्यूझीलंडने केली कमाल, सगळ्यांना झाली कोलकाता कसोटीची आठवण