वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतावर 80 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-1ने मागे आहे.
या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग असता तर भारताने हा सामना सहज जिंकला असता. कारण भारताने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन वेळा 200 किंवा 200 पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना सामना जिंकला आहे. या दोन्ही सामन्यात युवराजने महत्त्वाची भुमिका पार पाडली होती.
यातील 2009मध्ये श्रीलंका विरुद्ध झालेला सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला होता. यावेळी श्रीलंकेने भारतासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना युवराजने अष्टपैलू खेळी करत 25 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या होत्या. तर 23 धाव देत 3 विकेट्सही घेतल्या होत्या. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
2013मध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना युवराजने 35 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी केली होती. या पण सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला होता.
आजच्या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सुमार कामगिरी झाली. यावेळी भारताकडून एमएस धोनीने सर्वाधिक 39 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–आजचा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी, कधीही विचार नाही केला तो विक्रम नावावर
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती
–या दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटूचा टी२० क्रिकेटला अलविदा ?