Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘यात कसलीच शंका नाही, ते सर्व भारताचे…’, विलियम्सनचे टीम इंडियाच्या नवीन खेळाडूंविषयी वक्तव्य

'यात कसलीच शंका नाही, ते सर्व भारताचे...', विलियम्सनचे टीम इंडियाच्या नवीन खेळाडूंविषयी वक्तव्य

November 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Nz-vs-Ind

Photo Courtesy-Twitter/BLACKCAPS


न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला पहिला सामना खेळता आला नाही. याला पाऊस कारण ठरला. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघाताल पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे कदाचित दोन्ही संघाच्या खेळाडूंव्यतिरिक्त चाहत्यांची नक्कीच निराशा झाली असेल. मात्र, या मालिकेतील 2 सामने अजूनही खेळायचे आहेत. अशात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनची भारतीय खेळाडूंबद्दल मोठी प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे. चला तर जाणून घेऊयात काय म्हणाला विलियम्सन…

काय म्हणाला केन विलियम्सन?
केन विलियम्सन (Kane Williamson) म्हणाला की, “टी20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेनंतर वेगाने बदल झाला आहे. यानंतर आम्ही भारताविरुद्ध खेळण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. अधिकतर संघ मोठ्या स्पर्धांसाठी तयार आहेत, ज्या खूप दूर नाहीयेत. तसेच, वनडे क्रिकेट प्रकार हा आता खेळाडूंसाठी एक शानदार संधी असेल. मला विश्वास आहे की, खेळाडूंना चमकण्यासाठी खूप साऱ्या संधी मिळतील. आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि पाहावे लागेल की, आम्हाला कशाप्रकारे खेळपट्ट्या मिळतात, जिथे आम्हाला जुळवून घ्यायचे आहे.”

भारतीय खेळाडूंबद्दल विलियम्सनचे वक्तव्य
न्यूझीलंडच्या कर्णधाराने असेही म्हटले की, टी20 विश्वचषकात ऍडम मिल्नेयासारख्या खेळाडूंना संधी मिळाली नव्हती. आता त्याला काही सामन्यात संधी मिळाली पाहिजे. भारतीय संघाविषयी तो म्हणाला की, “यामध्ये कोणतीही शंका नाही की, ते सर्व भारताचे मोठे खेळाडू आहेत. मी आयपीएलमध्ये पाहिले आहे की, त्यांच्याकडे शानदार गुणवत्ता आहे. ही नवीन मालिका आहे आणि आम्ही नव्याने सुरुवात करू.”

The first T20I in Wellington has been abandoned without a ball being bowled ⛈️

Watch the remainder of the #NZvIND series LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺 pic.twitter.com/WfUpaHS4an

— ICC (@ICC) November 18, 2022

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर वेलिंग्टन येथे सकाळपासूनच पावसाचे सावट दिसत होते. काही वेळ पाऊस थांबलाही होता, पण नंतर पाऊस सुरूच राहिला. शेवटी पंचांना हा सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.हा सामना नाणेफेकीशिवाय रद्द करण्यात आला. ही टी20 मालिका एकूण 3 सामन्यांची आहे. या मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाणार आहे. (nz vs ind Kane Williamson reaction on indian cricket team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: विश्वचषकातील पराभवाचे खापर फोडत बीसीसीआयने बरखास्त केली संपूर्ण निवडसमिती
‘त्याला मी रोखणार नाही, पण…’, आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे ‘या’ अष्टपैलूबद्दल वक्तव्य


Next Post
Team India

पुढील महिन्यात टीम इंडिया करणार ऑस्ट्रेलियाशी दोन‌ हात; या शहरामध्ये रंगणार थरार

आंतरशालेय हॉकी सेंट पॅट्रिक प्रशालेची विजयी सलामी

Glenn-Phillips

भारतीय मूळ असलेल्या 'या' मुलाला मिळाला न्यूझीलंडच्या विस्फोटक फलंदाजाचा ऑटोग्राफ, पाहा व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143