---Advertisement---

वनडेत कर्णधार म्हणूनही मितालीचेच ‘राज’! कोणतीच क्रिकेटर ‘या’ विक्रमात आसपासही नाही

On: गुरूवार, मार्च 10, 2022 5:00 PM
Mithali-Raj
---Advertisement---

भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक खेळला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राजच्या हातात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती. परंतु, स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. असे असले तरी, कर्णधार मिताली राजच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

भारतीय महिला संघाची ३९ वर्षीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिच्याकडे अनुभवाची कसलीही कमी नाहीय. तिच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये विश्वचषकात चांगले प्रदर्शन करेल याची सर्वांनाच खात्री आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मितालीने मैदानात पाय टाकताच एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. मिताली राज पहिली अशी महिला खेळाडू बनली आहे, जिने १५० एकदिवसीय सामन्यांमध्ये स्वतःच्या संघाचे नेतृत्व केले आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स (Charlotte Edwards) आहे, जिने ११७ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क (Belinda Clark) आहे, जिने १०१ एकदिवसीय सामन्यांमध्ये स्वतःच्या संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर सुझी बेट्स (Suzie Bates) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, जिने ७६ एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. मेरिसा अगुइलेरा (Merissa Aguilleira) या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, जिने वेस्ट इंडीजसाठी ७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

दरम्यान, मिताली राजने हा मोठा टप्पा गाठला असला, तरी कर्णधाराच्या रूपातील १५० व्या एकदिवसीय सामन्यात तिला पराभव मिळाला आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे ९ विकेट्सच्या नुकसनावर २६०  धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४६.४ षटकांमध्ये आणि १९८ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी न्यूझीलंडचे हा सामना ६२ धावांनी जिंकला.

महत्वाच्या बातम्या –

Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट

सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज

 पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा: माव्हरिक्सची जॅग्वार्सवर मात, सेलर्सचाही रोमहर्षक विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---