टी-20 विश्वचषक 2022 संपल्यानंतर आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामधून थेट न्यूझीलंडसाठी रवाना झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दौऱ्यात खेळणार नाहीत. सूर्यकुमार यादव मात्र संघासोबत न्यूझीलंडमध्ये पोहोचला आहे. सूर्याने याठिकाणी पोहोचताच एक ट्वीट केले, ज्यावर ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू अमांडा वेलिंग्टन हिने प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात पहिल्यांदा टी-20 आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेची सुरुवात 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन शहरात खेळला जाणार आहे. तर एकदिवसीय मालिका 25 नोव्हेंबरपासून ऑकलॅंडमध्ये सुरू होईल. टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघ वेलिंग्टनमध्ये पोहोचला आहे. याठिकाणी पोहोचल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत, “हॅलो वेलिंग्टन” असे लहिले. सूर्याच्या या ट्वीटवर ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू अमांडा वेलिंग्डन (Amanda Wellington) हिने प्रत्युत्तर दिले आहे.
अमांडा वेलिंग्टनने सूर्यकुमारच्या ट्वीटला रिट्वीट करत लिहिले की, “हॅलो यादव.” अमांडाच्या या ट्वीटवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. सूर्यकुमारने हे ट्वीट वेलिंग्टन शहरात पोहोचल्याची माहिती देण्यासाठी केले होते, पण अमांडाने देखील संधी साधत सूर्यकुमारची फिरकी घेतली. चाहत्यांनी देखील या प्रकरणाला वेगळे वळण दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चाहते अनेक मेजेशीर मीम्स आणि प्रतिक्रिया या प्रकरणानंतर शेअर करत आहेत.
Hello Yadav 😂 https://t.co/ALgBHmTkI0
— Amanda Wellington (@amandajadew) November 13, 2022
दरम्यान, टी-20 विश्वचषकात भारतीय संघ चांगले प्रदर्शन करत होता. पण उपांत्य सामन्यात इंग्लंडने त्यांना पारभवाची धूळ चारत अंतिम सामन्यात जागा पक्की केली. इंग्लंडची विजयी घोडदौड अंतिम सामन्यात देखील कायम राहिली. अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडने पाच विकेट्स राखून पराभूत केले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेते बनले. विश्वचषकातील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली विश्रांतीवर गेले आहेत. हार्दिक पंड्या () न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचा कर्णधार असेल. तर रिषभ पंत संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडेल. शुबमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना मात्र पुन्हा भारतासाठी खेळण्याची संधी या दौऱ्यात मिळणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेले भारतीय संघ –
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक. (nz vs ind t20i series australia womens cricketer wellington replies suryakumar yadav on twitter)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नर होणार निवृत्त? स्वतःच सांगितला आपला फ्युचर प्लॅन
VIDEO: सामना ऑस्ट्रेलियात, राडा पंजाबमध्ये! इंग्लंड-पाकिस्तान सामन्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये दगडफेक