---Advertisement---

NZ Vs SA : न्यूझीलंडनं संपवला 92 वर्षांचा दुष्काळ! केन विल्यमसनने गेल्या 7 सामन्यात झळकावली सात शतके

On: शुक्रवार, फेब्रुवारी 16, 2024 3:14 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केलाय. या विजयासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड संघानं प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्यात यश मिळविलंय. तर दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंडनं 2-0 नं मालिका जिंकली आहे.

याबरोबरच, गेल्या एक-दोन वर्षांपासून केन विल्यमसनला दुखापतींच्या अनेक समस्या होत्या. तसेेच  त्याने मागील सात कसोटी आणि 12 डावांत 7 शतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर हॅमिल्टनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विल्यमसनने दुसऱ्या डावात 133 धावांची नाबाद खेळी करत त्याचे या मालिकेतील हे तिसरे शतक होते.

आत्तापर्यंत केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये 32 शतके केली आहेत. याबरोबरच या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडला होता. तसेच तो आता सचिन तेंडुलकरच्याही पुढे गेला आहे. या मालिकेपूर्वी त्याने 29 कसोटी शतके झळकावली होती. आता त्याच्या नावावर एकूण 32 कसोटी शतके आहेत. एवढेच नाही तर विल्यमसन सर्वात वेगवान 32 शतके करणारा फलंदाज देखील बनला आहे. तसेच केन विल्यमसन आता स्टीव्ह स्मिथच्या सर्वाधिक कसोटी शतकाची बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 32 शतके करणारे फलंदाज

केन विल्यमसन – 172 डाव

स्टीव्ह स्मिथ – 174 डाव

रिकी पाँटिंग – 176 डाव

सचिन तेंडुलकर – 179 डाव

युनूस खान – 193 डाव

दरम्यान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी मालिका 1932 साली खेळली गेली. दक्षिण आफ्रिकेनं दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली होती. तेव्हापासून, म्हणजे गेल्या 92 वर्षांत, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या 18 कसोटी मालिकांपैकी एकही मालिका जिंकली नव्हती. यातील चार कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या तर दक्षिण आफ्रिकेनं 14 मालिका जिंकल्या. आज पहिल्यांदाच किवी संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवला आहे. तसेच ल्यमसननं अनेक मोठे विक्रमही मोडीत काढले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---