न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे, ज्यातील पहिला सामना रविवारपासून (दि. 4) सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघ फलंदाजीसाठी उतरला. यावेळी न्यूझीलंड संघाने पहिल्या दिवसअखेर 2 गडी गमावत 258 धावा केल्या. ज्यात कर्णधार केन विलियम्सन आणि रचिन रविंद्र या दोघांनी खणखणीत शतक झळकावले. रचिन रविंद्र हा युवा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत न्यूझीलंड संघातील आपले स्थान बळकट करत आहे. तर दुसरीकडे केन विलियम्सन याने पुन्हा एकदा संस्मरणीय खेळी करत क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले.
केन विलियम्सन याने आता झळकावलेले शतक हे विक्रमी शतक ठरले आहेत. त्याने अनेक रेकॉर्ड त्याच्या नावे केले आहेत. ज्यात विराट कोहली यालाही त्याने मागे टाकले आहे. केन विलियम्सन याने सक्रीय खेळाडूंमध्ये कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. विलियम्सनने मागील 9 कसोटी डावांमध्ये 5 शतके झळकावली आहेत. ( NZvsSA Kane Williamson Surpasses Virat Kohli and Don Bradman in Most Test Hundred List )
- केन विल्यमसनचे कसोटी कारकिर्दीतील हे 30 वे शतक आहे. या शतकासह तो कसोटीत सर्वाधिक शतके बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीच्या पुढे गेलाय. विराटने आतापर्यंत कसोटीत 29 शतके झळकावली आहेत आणि केनच्या शतकामुळे विराट कोहली कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फॅब फोरच्या यादीत तळाशी गेला आहे.
फॅब-फोरमध्ये सर्वाधिक कसोटी शतके;
स्टीव्ह स्मिथ – 32 शतके (107 सामने)
केन विल्यमसन – 30* शतके (97 सामने)
जो रूट – 30 शतके (१३७ सामने)
विराट कोहली – 29 शतके (113 सामने)
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांनी शतके झळकावून या मालिकेची धमाकेदार सुरुवात केली आहे. तर, पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 258 धावा केल्यात. ज्यात केन विल्यम्स 112 आणि रचिन रविंद्र 118 धावांवर नाबाद आहेत.
अधिक वाचा –
– कमी खेळला पण भावाने रेकॉर्डच केला! इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ‘हिटमॅनचा’ भीमपराक्रम, कोहलीला टाकले मागे । Rohit Sharma Record
– मोठी बातमी! पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूला 7 वर्षांची जेल, चुकीच्या पद्धतीने लग्न केल्यामुळे शिक्षा
– अर्ध्यात कॉमेंट्री सोडून का गेले होते सुनिल गावसकर? खरं कारण आलं समोर, गावसकरांवर कोसळलाय दुःखाचा डोंगर । Sunil Gavaskar