रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूर (Nagpur) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात टी20तील तिसरा सामना (3rd T20 Match) पार पडला. या सामन्यात भारताने 30 धावांनी (Won by 30 Runs) बांगलादेशच्या संघाला पराभूत केले. तसेच, भारताने 2-1ने मालिका जिंकली.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) शेवटच्या षटकामध्ये हॅट्रीक घेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 3.2 षटकात फक्त 7 धावा देत सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.
त्याच्या या कामगिरी नंतर त्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघात स्थान द्यायला पाहिजे, अशी क्रिकेट चाहत्यांनी चर्चा सुरु केली आहे.
चाहरनेही विश्वचषकात खेळण्याचे ध्येय असल्याचे मान्य केले आहे. पण तरीही अजून विश्वचषकासाठी 11 महिन्याचा कालावधी असल्यामुळे त्याचा जास्त विचार करत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
“टी20 विश्वचषकला 11महिन्यांचा कालावधी आहे. हा खूप मोठा काळ आहे. नक्कीच विश्वचषक खेळण्याचे मनात आहे. आमचे लक्ष ट्राॅफी जिंकणे हे आहे. परंतु, एक खेळाडू म्हणून तुम्ही लगेच खूप पुढचा विचार करु शकत नाही. या विश्वचषकापूर्वी अजून अनेक आंतरराष्ट्रीय सामने आहेत. तसेच, आयपीेएल (IPL) देखील आहे,” असे दीपक चाहरने आयएएनएसला सांगितले.
“मी प्रत्येक सामना माझा शेवटचा सामना आहे असे समजून खेळतो. कारण सध्या भारतीय संघातील गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे सकारात्मक स्पर्धा संघात आहे. तसेच संघात स्थान पक्के करणे हे खूप कठीण आहे. त्याचमुळे मी मला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.’असेही चाहर म्हणाला.
त्याचबरोबर संघ व्यवस्थापनाचा माझ्यावरील विश्वास वाढवायचा आहे, असेही चाहर म्हणाला आहे.
बांगलादेश विरुद्ध शानदार कामगिरी करणारे श्रेयस अय्यर, शिवम दुबे आता खेळणार या स्पर्धेत!
वाचा 👉 https://t.co/AIAtdFh1DA 👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019
रणवीर सिंगच्या 'नटराज शाॅट'वर कपिल देव म्हणतात…
वाचा- 👉https://t.co/I0sHGEqBus👈#म #मराठी #KapilDev #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019