सध्या भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषकात शनिवारी (7 ऑक्टोबर) दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक व रासी वॅन डर डसेन या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 204 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी आपापली शतके पूर्ण केली.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1710610970530533491?t=7-myw_4s8lRb6zAR6RG4zA&s=19
यावेळी विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार केवळ आठ धावा करून माघारी परतल्यानंतर डी कॉक व रासी वॅन डर डसेन यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी श्रीलंकन गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. सुरुवातीला डसेन याने आक्रमण केले होते. मात्र , अर्धशतक केल्यानंतर डी कॉक याने आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला. त्याने केवळ 83 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे वनडे विश्वचषकातील पहिले शतक ठरले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने 84 चेंडूंमध्ये 12 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या.
दुसऱ्या बाजूने डसेनने देखील आपल्या फलंदाजीचा दर्जा दाखवला. आपल्या वनडे कारकीर्दीतील पाचवे शतक झळकावले.
(ODI Cricket World Cup de Kock And Van der Duseen Hits Century Against Srilanka)
हेही वाचा-
‘एक पराभव आमचं काहीही…’, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव होताच इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराचे बडेबोल
“मला लाज वाटतेय…”, बीसीसीआयच्या वर्ल्डकप आयोजनावर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया






