वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (8 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावांवर सीमित राहिला.
India spinners shared six wickets among them to restrict Australia to a modest total ????#CWC23 | #INDvAUS
Details ????https://t.co/Zn0PmDdUiJ
— ICC (@ICC) October 8, 2023
प्रथम गोलंदाजीची संधी मिळाल्यावर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव ठेवला. बुमराह याने मिचेल मार्शला खातेही न खोलू देता बाद केले. डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. कुलदीप यादवने वॉर्नरला बाद केले. त्यानंतर रवींद्र जडेजाने भारतीय संघाला सामन्यात पिछाडीवर पडू दिले नाही. त्याने स्मिथ, केरी व लॅब्युशेन यांना दोन षटकांच्या आतच बाद करत ऑस्ट्रेलियाला संकटात टाकले. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क यांनी थोडेफार योगदान देत ऑस्ट्रेलियाला 199 पर्यंत पोहोचवले.
भारतीय संघासाठी या सामन्यात सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. रवींद्र जडेजा याने सर्वाधिक तीन बळी टिपले. त्याला जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेत साथ दिली. तर रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज व हार्दिक पंड्या यांना देखील एक-एक बळी मिळाला.
(ODI World Cup 2023 India Restirct Australia On 199 Kuldeep Jadeja Shine)
महत्वाच्या बातम्या –
जडेजाच्या फिरकीपुढे स्मिथ निरुत्तर! पाहा कसा उडवला दिग्गजाचा त्रिफळा
जड्डू चमकला रे! एकाच ओव्हरमध्ये 2 कांगारू फलंदाजांना केलं चालतं, भारतीय संघ मजबूत स्थितीत






